अमरावती- विधानसभानिवडणुकीत आठही मतदारसंघांत पराभव पत्करावा लागल्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये मंथन सुरू आहे. मात्र, िजल्हामध्ये फेरबदलाचे कोणतेही संकेत नसल्याचे सूत्रांनी सांिगतले. पराभवाच्या कारणांचा शोध घेत वरिष्ठांकडून आढळलेल्या गोष्टींची गंभीर दखल घेण्यात येणार असल्याचे संकेत आहेत.
नुकत्याच आटोपलेल्या विधानसभा निवडणुकीत िजल्ह्यातील आठही मतदारसंघांमध्ये िशवसेनेच्या उमेदवारांना पराभव पत्करावा लागला. २००९ मधील विधानसभेत िजल्ह्यातून दर्यापूरची एकमेव जागा िशवसेनेकडे आली होती. मात्र, या निवडणुकीत अभिजित अडसूळ यांना ितसऱ्या क्रमांकाची मते मिळाल्यामुळे पक्ष निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. केवळ बडनेरा मतदारसंघातच िजल्हाप्रमुख संजय बंड यांनी काट्याची लढत िदली. ितवसा दर्यापूर मतदारसंघांत शिवसेनेचे उमेदवार ितसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेले. याच बरोबर अमरावती, अचलपूर, धामणगावरेल्वे, मोर्शी आणि धारणी आदी मतदारसंघांत पक्षाला अपेक्षित यश संपादन करता आले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील पक्षाची स्थिती लक्षात घेता व्यापक संघटनात्मक फेरबदलाची शक्यता वर्तवण्यात येत होती.
शवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला िमळाले नाही अपेक्षित यश
शतकोत्तरी वाटचाल करणारी काँग्रेस आणि त्यातूनच वेगळी होऊन दोन दशकांपूर्वी स्थापन झालेली राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांची महाराष्ट्रातील सत्तेची संधी संपली आहे. मराठी बाणा असलेल्या िशवसेनेलाही या िनवडणुकीत अपेक्षित यश साध्य करता आले नाही. या पार्श्वभूमीवर हे ितन्ही पक्ष सध्या िवचारमंथन करीत आहेत. पराभव पदरी पडलेल्या कमी यशाची मीमांसा करून भविष्यातील िदशा िनश्चित करण्याची त्यांची तयारी सुरू आहे. नेमके हेच जाणून घेण्याच्या दृष्टीने त्या-त्या पक्षातील प्रमुख पदािधकाऱ्यांशी झालेला हा संवाद...
राष्ट्रवादी : आठवडाभरात बैठकांच्या तारखा, पक्षातफेरबदलाचे संकेत नाही
अमरावती| आठवडाभरातिजल्हािनहाय बैठकांचा कार्यक्रम िनश्चित केला जाईल. सध्या पक्ष संघटनेत कोणत्याही प्रकारचे फेरबदल प्रस्तावित नाहीत. मात्र, पराभवाची मीमांसा करण्यासाठी िवदर्भासह राज्यभर बैठका घेतल्या जाणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अमरावती िजल्ह्याचे िनरीक्षक असलेले माजी मंत्री अनिल देशमुख यांनी सांिगतले. अनिल देशमुख यांच्या खांद्यावर अमरावतीसह इतरही काही िजल्ह्यांची जबाबदारी आहे. त्या सर्व िजल्ह्यांत अशा बैठका आयोजित करून वास्तविकता जाणून घेतली जाईल, असे सांगून येत्या चार-पाच िदवसांत
आपण अमरावतीत येऊ, हे सांगायलाही ते िवसरले नाहीत.
काँग्रेस: घाई करण्याची सध्या गरज नाही
अमरावती| पराभवाबाबतचर्चा करून नवी िदशा िनश्चित करणे, हा नेहमीचा िशरस्ता असला तरी अशा बैठकांसाठी काँग्रेसला घाई नाही. काँग्रेस हा फार जुना पक्ष आहे. िशवाय देशात काँग्रेस आणि भाजप हे दोनच पक्ष असतील, त्यामुळे घाई करण्याची गरजही नाही, असे काँग्रेसचे माजी िजल्हाध्यक्ष आमदार प्रा. वीरेंद्र जगताप यांनी सांिगतले. िनवडणुकीनंतर सुरू असलेल्या पक्षांतर्गत घडामोडी जाणून घेण्यासाठी िजल्हाध्यक्ष बबलू देशमुख उपलब्ध झाल्याने प्रा. जगताप यांच्याशी संपर्क केला असता,ते म्हणाले, काँग्रेस सध्या ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत आहे. अद्याप िवजयी आमदारांपैकी नेता िनवडही व्हायची आहे. ते झाल्यानंतरच संघटनात्मक बाबी अजेंड्यावर येतील.