आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

40 हजारांच्या संत्र्याचे पुण्यात झाले दीड लाख!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महेंद्र बोंडे यांच्याकडे असलेल्या चार एकर शेतापैकी दोन एकर शेतात अंदाजे २३० संत्र्याची झाडे आहेत. संत्र्याचे भाव ऐन हंगामात गडगडले. दहा ते बारा हजार रुपये प्रतिटनप्रमाणे व्यापारी संत्रा घेण्यास तयार नव्हते. अशा परिस्थितीत बागेत येणारा व्यापारी बागेची किंमत ४० ते ४५ हजार रुपये ठरवत होता. आमची अपेक्षा १० ते १५ हजार रुपये भाव अधिक मिळावा इतकीच होती. मात्र भाव वाढण्याऐवजी घसरतच होते. त्यानंतर येणाऱ्या व्यापाऱ्यांनी ३० हजारातच बाग मागितली. यावेळी कुटूंबियांनीही नाईलाजाने बाग विकून टाकण्यास सांगितले. दरम्यान, केम कृषी समृध्दी उत्पादक संघाच्या माध्यमातून पुणे येथे माल विकण्याची संधी मिळाली. नाही तरी तोट्यात होतो म्हणून नुकसान होणारच होते. त्यापेक्षा पुण्यात जाण्याची ‘रिस्क’ घेऊ माल आता पुण्यातच विकू असा निश्चय मनाशी केला. बागेतील टन संत्री घेऊन पुण्याला रवाना झालो. याच संत्र्यांचे जवळपास ४५ हजार रुपये खर्च वजा जाता लाख ६० हजार रुपये निव्वळ नफा मिळाला आहे. पुण्यात तीन दिवसात सात टन संत्रा विकला आहे. हे पाहून गावातील १० ते १२ शेतकरी आता पुण्याला संत्रा घेऊन विक्रीसाठी रवाना झाले आहेत. इतर शेतकऱ्यांनीसुद्धा बाहेरची बाजारपेठ पकडावी.
वरूड तालुक्यातील नागझिरा गावातील श्रीकांत काळे या शेतकऱ्यांकडे दोन एकराची संत्रा बाग आहे. यांचीही स्थिती बोंडे यांच्यासारखीच होती. त्यांनीही दोन एकरातील पाच टन संत्रा विकण्यासाठी पुण्यात नेला होता. गावात व्यापारी आल्यानंतर कदाचित जास्तीत जास्त ६० हजार रुपयांना मागितला असता. केमच्या मदतीने बगिच्यातील संत्रा थेट पुण्यात विक्रीसाठी नेला. जाण्या येण्याचा संपूर्ण खर्च वजा करता लाख ३० हजारांचा नफा मिळाला आहे.
पहिल्यांदा संत्रा घेऊन पुण्यात विक्रीसाठी आलो. अचलपूर तालुक्यात आम्ही शेतकऱ्यांचा कृषी समृध्दी उत्पादक कंपनी नावाने शेतकरी गट स्थापन केला आहे. केमच्या प्रयत्नामुळे आम्हाला पुण्यात संत्राविक्रीची संधी मिळाली. स्वत: मेहनत करून पिकवलेला माल आम्ही स्वत: विकत आहो. त्यामुळे मालाचा भाव व्यापाऱ्यांऐवजी आम्ही ठरवून थेट विक्री करत आहोत, याचे जास्त समाधान आहे. या सर्व परिसरातील शेतकरी एकत्र आल्यामुळे शक्य झाले आहे.इतरांनीही सामूहिक प्रयत्न करायला हवा.