आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Low Cast Airplane Now Started In Amravati, News In Marathi

अमरावतीमध्‍ये ‘लो कॉस्ट’ विमानतळांसाठी केंद्र सरकारची मंजुरी प्राप्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - अत्यंत कमी खर्चात चालवले जाणारे विमानतळ म्हणून अमरावतीहून नागरी उड्डान सुरू करण्याला केंद्र सरकारने नुकतीच परवानगी मंजूर केली आहे. लोकसभेत केंद्रीय उड्डान राज्यमंत्री जी. एम. सिद्धेश्वरा यांनी प्रश्नोत्तराच्या तासात ही माहिती दिली.
अमरावतीपासून सुमारे 15 किलोमीटरवर असलेले बेलोरा विमानतळ सुरू करण्यात यावे, ही मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. महसूल विभागाची ही जागा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) त्यानंतर महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरण (एमएडीसी) आणि आता एयरपोर्ट अँथॉरिटी ऑफ इंडियाला (एएआय) हस्तांतरित झाली आहे. मात्र, सुरुवातीपासूनच या विमानतळावरून विमानसेवा नव्हती.

देशांतर्गत विमान प्रवास करायचा म्हटला, तरी अमरावतीकरांना नागपूर येथेच जावे लागत होते. अमरावतीपासून सुमारे 100 किलोमीटरवर असलेल्या अकोला येथेही एयरपोर्ट अँथॉरिटी ऑफ इंडियाचे विमानतळ आहे; परंतु तेथूनही विमानसेवा नाही. त्यामुळे नागपूर हाच पर्याय अमरावतीकरांपुढे होता. परिणामी, बेलोरा येथून विमानसेवा सुरू करण्याची मागणी सातत्याने जोर धरत होती. एएआयकडे विमानतळाची जागा हस्तांतरित झाल्यानंतरही बेलोराहून विमानांचे ‘टेक ऑफ’ होईल की नाही, याबद्दल साशंकता व्यक्त होत होती. मात्र, उड्डयन विभागाने देशभरातील दोनशे ‘लो कॉस्ट’ विमानतळांमध्ये अमरावतीचाही समावेश केल्याने छोट्या विमानसेवेच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत. दळणवळणासाठी उपयोग होईल.
विमानतळावर दृष्टिक्षेप
असा होतोय विकास
60 वर्षे: एयपोर्ट अॅथॉरिटी ऑफ इंडियाकडे बेलोरा विमानतळ राहणार आहे. त्यासाठी राज्याने एएआयशी करार केला आहे.
1 लाख : एएआय दरमहा राज्य सरकारला अमरावती विमानतळाचे भाडे अदा करणार आहे.
3 वर्षे: फेब्रुवारी 2014 पासून तीन वर्षांत एएआय विमानतळाचा विकास
15 कि.मी : अमरावतीपासून विमानतळाचे अंतर.
74.86 हेक्टर : विमानतळाचे क्षेत्रफळ.
4500 फूट : रन-वे ची जागा.
60 बाय 45 मीटर : रन-वे ची अॅप्रॉन जागा.
2500 मीटर : धावपट्टीचा विस्तार प्रस्तावित.
ए-320 : नवीन धावपट्टी ए-320 प्रकारच्या एयर बस वाहतुकीसाठी सज्ज.

बेलोराचा प्रवास
1992 : सार्वजनिक बांधकाम विभागाकडून विमानतळ उभारणी व एमआयडीसीला हस्तांतरण.
1997 : ऑगस्ट महिन्यात एमआयडीसीकडून एमएडीसीला हस्तांतरण.
2011 : नागपुरातील धावपट्टीच्या नूतनीकरणामुळे नागपूर फ्लाइंग क्लबचे अमरावतीत तात्पुरते स्थानांतरण.
2014 : फेब्रुवारी महिन्यात एमएडीसीकडून विमानतळ एयरपोर्ट अ?ॅथॉरिटी ऑफ इंडियाला हस्तांतरण.