आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिन्याकाठी लाखोंची टिप, सिलेंडर पोहोचवणा-याची ठेवावी लागते बडदास्‍त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - प्रत्येकघरातील जीवनावश्यक बाब असलेल्या एलपीजी गॅससिलिंडर प्राप्तीसाठी ग्राहकांना नेहमीच सतर्क राहावे लागते. अडचणीच्या वेळी सिलिंडर पोहोचवणाऱ्यांची िवशेष बडदास्त ठेवावी लागते. या मजबुरीचा फायदा घेत घरोघरीसिलिंडर पोहोचवणारे व्यक्ती कधी स्वच्छेने, तर कधी आग्रहास्तव ग्राहकांच्या िखशातून महिन्याकाठी लाखो रुपयांची ‘टिप’ घेत आहेत. या प्रकाराबाबत कंपनी,वितरक,एजन्सी मात्र अनभिज्ञ अाहे. ही एलपीजी ग्राहकांची लूट नव्हे काय, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

अमरावती शहरातजिल्‍हात गॅस सिलिंडरच्या वितरणासाठी एजन्सीकडून विशिष्ट भागासाठी एका व्यक्तीची नियुक्ती केली आहे. त्यामुळे दर महिन्याला गॅस सिलिंडर पोहोचवणारा एकच व्यक्ती असतो, म्हणून त्याची मर्जी ग्राहकांना सांभाळावी लागते. कधी १० तर कधी १२ ते १५ रुपयांपर्यंत त्यांना द्यावे लागतात. कोणी स्वेच्छेने, कोणी मन मारून तर कोणी फार आग्रह करीत आहे म्हणून जास्तीचे पैसे देत असतो. यामुळे आधीच सबसिडीचा बुरखा पांघरून महाग झालेल्या सिलिंडरमुळे ग्राहकांना नसता भुर्दंड सहन करावा लागत आहे. सिलिंडर पोहोचवणारे हे पगारी कर्मचारी असून, त्यांना ‘टीप’ द्यावी, असा कोणताही नियम नाही.काही बोटभर गरजूंनी याची सुरुवात केली. आता ‘टीप’ घेणे हा आपला अधिकारच आहे, अशा अविर्भावात ते कर्मचारी वागू लागल्याने जिल्ह्यात एकूण ४३ लाख ५० हजार रुपये केवळ ‘टीप’ म्हणून वाटले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अशा चुकीच्या पायंड्यामुळे जर खिशावर अतिरिक्त बोजा पडत असेल, तर ग्राहकाने कोणाकडे दाद मागावी!

500ते 600सततच्या तक्रारींमुळे त्रस्त
^सिलिंडरघरी नेऊन देणारे आमच्याकडून पैसे मागत असतात. कधी आम्ही स्वेच्छेने देतो, तर कधी ते द्यावेत म्हणून ते अडून बसतात. त्याचा आम्हाला त्रास होतो. आम्ही ते द्यावेत काय, ते योग्य आहे काय, अशा अनेक तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. आम्हीही त्रस्त आहोत. कुठे-कुठे लक्ष देणार? मात्र, या प्रकारांना आळा घालण्यावर आमचा प्रयत्न असतो. आम्ही शक्य ते करीतच आहोत. हसनजी,वितरक,विदर्भ गॅस एजन्सी, मालवीय चौक.

ग्राहकांच्या इच्छेचा प्रश्न
^घरीसिलिंडर पोहोचवणाऱ्या कर्मचाऱ्याला टिप म्हणून किती पैसे द्यायचेकिंवा द्यायचे नाहीत, हा सर्वस्वी ग्राहकांच्या इच्छेचा प्रश्न आहे. कंपनी, एजन्सीकिंवा वितरक ते मागत नाहीत. सिलिंडर पोहोचवणारे पगारी कर्मचारी असतात. त्यांनी पैस मागू नयेतकिंवा या प्रकारावर नियंत्रण आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. ग्राहकांचे समाधान आमच्यासाठी सर्वतोपरी आहे. संजयदेशमुख, अध्यक्ष,अमरावती जिल्हा गॅस डिलर्स संघटना.