आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपुरात घडणार विद्यापीठचा कला ‘आविष्कार’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- नागपूर येथील महाराष्ट्र पशू मत्स्य विज्ञान विद्यापीठात २१ ते २३ जानेवारीदरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय आविष्कार स्पर्धेसाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची चमू घोषित करण्यात आली आहे. जानेवारी रोजी विद्यापीठात झालेल्या आंतरमहाविद्यालयीन संशोधन महोत्सव आविष्कारमधून ही चमू निवडण्यात आली आहे.
जिल्हास्तरीय पदवी स्तरावरील निवड झालेले स्पर्धक, तसेच अभियांत्रिकी (सर्व) पदव्युत्तर संशोधन या गटातून एकूण सहा वर्गवारीत स्पर्धक सहभागी झाले होते. कोणत्याही विद्याशाखेच्या विद्यार्थ्याला कोणत्याही वर्गवारीमध्ये स्पर्धक म्हणून सहभाग घेता आला. या स्पर्धेमध्ये चार वर्गवारी सहा गटांमधून एकूण १४६ विद्यार्थी चमू सहभागी झाल्या होत्या. आंतरमहाविद्यालयीन स्तरातून नामवंत तज्ज्ञ परीक्षकांनी प्रथम फेरीमध्ये पोस्टर दुसऱ्या फेरीमध्ये मौखिक सादरीकरणाद्वारे उत्कृष्ट ३५ स्पर्धक राज्यस्तरीय स्पर्धेकरिता विद्यापीठाच्या चमूमध्ये निवड केली. निवड झालेल्या सर्व स्पर्धकांना कुलगुरू डॉ. मोहन खेडकर, प्र-कुलगुरू डॉ. जयकिरण तिडके, कुलसचिव प्रा. दिनेशकुमार जोशी, बीसीयूडीचे संचालक डॉ. अजय देशमुख यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवडलेल्या चमूचे सादरीकरण उत्कृष्ट प्रभावीपणे होण्याच्या दृष्टिकोनातून विद्यापीठामध्ये स्पर्धेचे समन्वयक डॉ. आनंद अस्वार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा घेण्यात आली. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. डॉ. एस. आर. माणिक, डॉ. पी. ए. वाडेगावकर, डॉ. एन. बी. शेलूकर, डॉ. प्रशांत गावंडे, डॉ. संदीप वाघुळे, डॉ. रवि सरोदे, डॉ. प्रणव कोलते, डॉ. प्रशांत शिंगवेकर, प्रा. गणेश हेंड, प्रा. जागृती बारब्दे, प्रा. राजेश भोयर, डॉ. वर्षा वाडेगावकर, प्रा. व्ही. के. नागले, डॉ. दीपक चाचरकर यांचे सहकार्य लाभले.