आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकसभेत मनसेची भूमिका राहणार तटस्थ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - अमरावती लोकसभा निवडणुकीत ऐनवेळी उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेणार्‍या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची यंदा तटस्थ भूमिका राहणार आहे. मात्र, कार्यकर्त्यांना र्मजीनुसार वागण्याची मुभा देण्यात आली असल्याची स्पष्टोक्ती पक्षाचे सह-समन्वयक रावसाहेब कदम यांनी दिली. ते पक्षकार्यकर्त्यांचा कल जाणून घेण्यासोबतच काही आवश्यक सूचना देण्यासाठी शहरात आले होते.


मनसे कार्यकर्त्यांनी दिलेला कल, जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीची पडताळणी तसेच उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर येथे एकही उपयुक्त उमेदवार नसल्याचे पक्षश्रेष्ठींच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी ऐनवेळी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारच उभा करायचा नाही, असा निर्णय घेतला.


विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मनसेने आतापासूनच जिल्ह्यात पक्षबांधणीला सुरुवात केली असून, जिल्हास्तरावर संघटन आणखी मजबूत करण्याच्या दृष्टीने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. तयारीसंदर्भात आतापासूनच पक्ष कार्यकर्त्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या असून, जिल्ह्याच्या प्रत्येक विभागासाठी उमेदवारही हेरून ठेवण्यात आले आहेत. ऑक्टोबर महिन्याच्या सुमारास होणार्‍या विधानसभा निवडणुकीची तयारी मनसे मे महिन्यापासूनच सुरू करणार आहे. या दृष्टीने अमरावती येथील संत ज्ञानेश्वर सभागृहात महामेळाव्याचे आयोजन केले जाणार असल्याची माहितीही कदम यांनी दिली.


पक्षकार्यकर्ते मर्जीप्रमाणे निर्णय घेतील : मनसेची लोकसभा निवडणुकीत जिलहय़ात तटस्थ भूमिका राहणार असली, तरी पक्ष कार्यकर्त्यांना त्यांच्या र्मजीनुसार काम करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यांच्यावर पक्षाचे कोणतेही बंधन नाही. त्यांच्या मनाला वाटेल तसा निर्णय घेण्यास ते मुखत्यार असतील, असे रावसाहेब कदम यांनी सांगितले.