आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra State Inter University Youth Festival

एकांकिकांनी मांडले सामाजिक वास्तव, दर्जेदार कथा, अभिनयाला रसिकांच्या टाळ्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- वास्तवाचेभान मांडत रंगमंचावर येणाऱ्या एकांकीका, परिस्थितीशी झगडणारा नायक, कधी गंभीर तर, कधी खदखदून हसण्यास भाग पाडणारा अभिनय, भरगच्च प्रतिसाद देणारे रसिक असे वातावरण विद्यार्थी कल्याण सभागृहात पहायला मिळाले. महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ युवा महोत्सवात गुरूवारी १५ विद्यापीठांच्या चमूने आपल्या एकांकिका सादर केल्या.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांनी बलात्कार प्रश्नावरील युथ फेस्टीवल”, महाराष्ट्र पशु मत्स विज्ञान विद्यापीठ, नागपूर यांनी मुंशी प्रेमचंद यांच्या कथेवर आधारित ताई”, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांनी काऊंटर अॅक्शन”, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांनी कलोपजीवी भटक्या समाजावरील फोटू” या एकांकिका पहिल्या सत्रात सादर केल्या. दुपारनंतर महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी यांनी पेस्ट्री”, डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, परभणी, लोणेरे यांनी “बघतोस काय? मुजरा कर”, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला यांनी “हनम्याची मरीमाय” , राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांनी ‘मोगलांनी सत्ता दान केली’ अशा विविध एकांकिका सादर केल्या. पोट भरण्यासाठी माणूस कोणत्या स्तराला जाऊ शकतो हे सांगणारी ‘मसनातील सोनं’ ही एकांकिका डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथील चमूने सादर केली.