आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mahatma Gandhi Jayanti, Latest News In Divya Marathi

मतदार जागृतीने विद्यार्थ्यांचे राष्ट्रपुरुषांना अभिवादन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- शांतीनगरयेथील साक्षरा पॅराडाइज इंग्लिश हायस्कूलच्या वतीने गांधी जयंती निमित्त विद्यार्थ्यांची फेरी काढण्यात आली. महात्मा गांधी यांच्या वेशभूषेत सहभागी झालेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.
सुमारे तीनशे विद्यार्थ्यांनी जनजागृती फेरी काढून ‘मतदान करा’ असा संदेश शांतीनगर परिसरात दिला. शाळेच्या शिक्षिकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या फेरीतून विद्यार्थ्यांनी शिस्तीचे दर्शन घडवले. विविध घोषणांनी या वेळी परिसरातील चौक दणाणले होते. मतदान जागरूकतेविषयीचे फलक घेऊन विद्यार्थी फेरीत सहभागी झाले होते.महात्मा गांधी यांच्या भूमिकेतील चिमुकल्यांनी परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधले.
‘गांधीं’च्या घोषणांनी वेधले लक्ष
डोक्यावरिवग, डोळ्यांवर गोल चष्मा, काठी आणि धोती परिधान करून गांधीजींची वेशभूषा धारण केलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी मतदार जनजागरूकतेविषयक विविध घोषणा दिल्या.
विद्यार्थ्यांनी लोकांचे लक्ष वेधले.
श्री समर्थ हायस्कूल येथे महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर परिसरातील ज्येष्ठ नागरिकांचा गौरव करण्यात आला. मुख्याध्यापक माधवी मंगळूरकर यांनी नागरिकांना मतदान जागृतीचा संकल्प दिला. विद्यार्थ्यांनी मतदान जागृतीसंदर्भात फेरी काढली. शाळेपासून रविनगर चौक, बियाणी कॉलेजच्या मागील परिसरातून, बडनेरा रोड असा फेरीचा मार्ग होता.