आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mahatma Gandhi Jayanti,latest News In Divya Marathi

गांधीजींसाठी नटली होती अंबानगरी, शहरातील भाषणांना झाली होती भरगच्च गर्दी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- जुन्याअमरावती शहरातील स्वातंत्र्यसैनिक, चळवळीतील कार्यकर्ते संस्थांविषयी महात्मा गांधी यांना आपुलकी होती. १९३३ मध्ये वडाळी येथे अमरावतीकरांनी त्यांचे जंगी स्वागत केले होते. अवघी अंबानगरी त्यांच्या स्वागतासाठी सजली होती.
शहरात विविध ठिकाणी झालेल्या त्यांच्या भाषणांना मोठी गर्दी झाली होती. १९३३ मध्ये १६ नोव्हेंबरला महात्मा गांधी शहरात आले होते. हजारो स्त्री-पुरुषांनी त्यांच्या भाषणाला उपस्थिती लावली होती. ‘अमरावती शहराचा इतिहास’ या पुस्तकात तत्कालीन प्रसंगांची नोंद आहे. वडाळी येथे सुरुवातीला त्यांचे स्वागत झाले. बडनेरा रोडवरील श्री शिवनाथ बाबू यांच्या बगीच्यात त्यांच्या उतरण्याची व्यवस्था केली होती. १६ तारखेला शहरात विविध ठिकाणी त्यांचे कार्यक्रम झाले, अनेकांच्या भेटीगाठी झाल्या. १७ नोव्हेंबरला ते शहरातून कारंजाला रवाना झाले होते. शहरात पताका, तोरणे लावून कमानी उभारून नागरिकांनी महात्मा गांधीजी यांचे स्वागत केले. मुधोळकर पेठ युवक मंडळातील कार्यकर्त्यांनी पताका तोरणांनी बडनेरा रोड, तर अंबागेट युवक मंडळाने अंबादेवी मार्ग सजवला होता. लोक उत्सुकतेने त्यांच्या येण्याची वाट पाहत होते. गांधीजींना मिरवणूक आवडत नसल्याने वडाळी तलाव परिसरात त्यांचे स्वागत करण्यात आले. रा. ब. ब्रह्म, वीर वामनराव जोशी, नानासाहेब बामणगावकर, बॅ. रामराव देशमुख, डॉ. सोमण, डॉ. वऱ्हाडपांडे आदी मंडळी त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होती. श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या नगर संरक्षण दलाचे सैनिकही व्यवस्थेत होते. सुमारे दोन हजार लोक स्वागतासाठी हजर होते.
अमरावतीच्यायुवकांना झाली होती अटक
१०फेब्रुवारी ४३ पासून एकवीस दिवसांच्या उपवासासाठी गांधी यांनी पुण्यातून सुरुवात केली. ही बातमी अमरावतीत पसरली, तेव्हा येथील सराफा बाजार, कापड बाजार कॉटन मार्केट बंद ठेवण्यात आले होते. या उपवासाच्या काळात अमरावतीचे काही युवक पुण्यात गेले. तेथे त्यांनी मोर्चा नेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना अटक करण्यात आली होती.
यांनीकेले स्वागत
महात्मागांधी यांचे शहरात आगमन झाल्यावर वडाळी येथे हरिजन सेवा संघ, स्वागत समिती, राष्ट्रीय मंडळ, कॅम्प नगरपालिका, वडाळीतील ग्रामस्थ, महिला, गुजराथी मंडळ, मारवाडी समाज, आर्य समाज, जैन समाज यांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले होते. जयंती दिन विशेष