आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उन्हाचा चटका; सार्‍यांना फटका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- विजेचा अतिरिक्त वापर इतका वाढला आहे, की कडाक्याच्या उन्हात शहराला जास्तीत जास्त 85 मेगावॅट विजेची गरज असते. ती यंदा जूनच्या पहिल्या आठवड्यात थेट 105 मेगावॉटपर्यंत पोहोचली आहे. यातच राज्यासाठी वीजनिर्मिती करणारे काही संच बंद पडले. परिणामी, नागरिकांसह महावितरणलाही जूनच्या उकाड्याचा जबर फटका बसला आहे.
विजेची 20 मेगावॉट अतिरिक्त मागणी अलीकडच्या काळात पहिल्यांदाच वाढली आहे. या अतिरिक्त मागणीत आणखी भर पडली ती राज्यात वीजनिर्मिती संचामधून मिळणारी नियमित वीज कमी झाली. त्यामुळे वापर जास्त आणि निर्मिती कमी, अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मागील आठवडाभरापासून शहरातील 54 फीडरपैकी औद्योगिक आणि एक्स्प्रेस फीडर वगळता इतर 39 फीडरवर भारनियमन सुरू झाले आहे.
अजूनही वीज निर्मितीमध्ये वाढ झालेली नाही किंवा उकाडा कमी झालेला नाही. अशावेळी भारनियमनाचे संकट आहे त्यापेक्षा अधिक गडद होण्याची शक्यताही महावितरणच्या सूत्रांनी वर्तवली आहे. वारंवार तासंतास वीजपुरवठा खंडित होत असल्याने अमरावतीकरांना बाहेर उन्हाचे चटके आणि घरात वीज नसल्याने उकाड्याचा सामना करावा लागतो आहे.