आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेळघाट नव्हे, अर्धा जिल्हाच कुपोषित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - महिला व बालकल्याण विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार आदिवासी भागापेक्षा अमरावती जिल्ह्यातील गैरआदिवासी भागातील कुपोषणाची आकडेवारी अवाक् करणारी आहे. मेळघाट वगळता जिल्ह्यात 78 टक्के, तर मेळघाटात केवळ 21 टक्के बालके कुपोषणग्रस्त आढळून आलीत.

मेळघाटातील कुपोषण जगभर पोहोचल्याने आरोग्य यंत्रणा कुपोषणाला आळा घालण्यासाठी युद्धपातळीवर कामाला लागली आहे. यात यंत्रणेला बर्‍यापैकी यशही येत आहे. यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मेळघाटातील भूभाग अतिदुर्गम असल्याने आरोग्य सोयी-सुविधा पोहचवण्यासाठी अनेक अडचणी येतात.

जिल्ह्यातील मैदानी भागात मेळघाटपेक्षा तुलनेने चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत. परंतु, जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या ऑक्टोबरपर्यंतच्या नोंदीवरून जिल्ह्यातील धारणी व चिखलदरा तालुका वगळता विविध र्शेणीतील 78.29 टक्के बालके कुपोषित आढळून आली आहेत. चिखलदरा व धारणी तालुक्यांत हेच प्रमाण 21.70 टक्के आढळून आले आहे. अमरावती तालुक्यात नऊ टक्के बालके कुपोषणग्रस्त आढळून आली आहेत.

कुपोषणाचे मापदंड वेगळे
महिला व बालकल्याण विभागाच्या आकडेवारीनुसार या बालकांना ‘कुपोषित’ असा शब्द वापरता येणार नाही. कुपोषणाच्या बाबतीत आरोग्य विभागाचे मापदंड वेगळे आहेत. परंतु, ही बाबही गंभीरच मानावी लागेल. डॉ. सुरेश आसोले, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी