आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मान्सूनपूर्व तयारी: पावसाळ्य़ापूर्वी करा आपत्तीचे नियोजन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- आपत्तीचा सामना करताना 25 सूत्री कार्यक्रमावर अंमल करण्याचे निर्देश मनपा आयुक्त अरुण डोंगरे यांनी दिले. मान्सूनपूर्व तयारीबाबत बैठक महापालिका सभागृहात मंगळवारी पार पडली. सर्व विभागप्रमुखांना सतर्क राहण्याच्या सूचना आयुक्तांकडून या वेळी देण्यात आल्या.

बैठकीत प्रामुख्याने 25 बाबींवर चर्चा करण्यात आली. शोध व बचाव पथकांची स्थापना व प्रशिक्षण, जनजागृती कार्यक्रम, प्रशिक्षण व घटक क्षमता उभारणी, शहरातील नाल्यांचा गाळ काढणे, संभाव्य पूरग्रस्त वॉर्ड, कॉलनी भाग शोधणे, नियंत्रण कक्षाची स्थापना व 24 तास उघडे ठेवणे, विद्युत व्यवस्था, रस्ते, प्रकाश व्यवस्था अद्ययावत ठेवणे, मोबाइल व लघुसंदेश यंत्रणेद्वारे निरंतर संपर्क व नियंत्रण, माहिती व मदत केंद्राची स्थापना, आरोग्य, पाणी शुद्धता, ब्लिचिंग पावडरची उपलब्धता, औषधी साठा, आर्शयस्थाने, रस्ते पूर्वदुरुस्ती, शिकस्त इमारतींना नोटीस, नागरिकांना आवाहन, सुरक्षित स्थळांचा शोध, उपलब्ध साधनसामग्री अशा महत्त्वपूर्ण मुद्दय़ांवर या वेळी चर्चा करण्यात आली. सर्व विभागप्रमुखांवर विविध स्वरूपाची जबाबदारी आयुक्तांनी दिली.

बैठकीला उपायुक्त रामदास सिद्धभट्टी, रमेश मवासी, मुख्य लेखापरीक्षक शेखर सोळके, मुख्य लेखापाल शैलेंद्र गोसावी, शहर अभियंता ज्ञानेंद्र मेर्शाम, सहआयुक्त राहुल ओगले, मदन तांबेकर, सुषमा मकेश्वर, योगेश पिठे, नरेंद्र वानखडे, पर्यावरण अधिकारी महेश देशमुख, कार्यकारी अभियंता अनंत पोतदार, वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक राठी, डॉ. देवेंद्र गुल्हाने, अतिक्रमण निर्मूलन विभागप्रमुख गंगाप्रसाद जयस्वाल, शिक्षणाधिकारी डॉ. सविता चक्रपाणी, उद्यान अधीक्षक प्रमोद येवतीकर, क्रीडा अधिकारी गजानन साठे, उपअभियंता अशोक देशमुख, दिलीप पडघन, सुहास चव्हाण, प्रमोद कुळकर्णी उपस्थित होते.