आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार दिवस शहरात मंत्र्यांची मांदियाळी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरात होणारे विविध कार्यक्रम आणि शासकीय बैठकांच्या निमित्तानेने शुक्रवार,१० एप्रिलपासून पुढील चार दविस मुख्यमंत्र्यांसह राज्य आणि केंद्र सरकारमधील तब्बल १० मंत्र्यांची शहरात मंदियाळी राहणार आहे. त्यामुळे पुढचे काही दविस शहरात मंत्र्याबरोबरच प्रशासनातील अनेक वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची आणि अतमिहत्वाच्या व्यक्तींची रेलचेल असणार आहे.

या दृष्टीने प्रशासनानेही मंत्र्याच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू केली आहे. नागपूर येथील कृषीविकास प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने १३ एप्रिलपर्यंत सायंस्कोर मैदानावर आयोजित केलेले राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन सपिना शिक्षण संस्थेच्या आयटीई मध्यकालीन राष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने केंद्र राज्य शासनाच्या अनेक मंत्र्यांचा हा जमावडा होणार आहे.

खाद्यपदार्थांच्या गाड्या लावण्यास मनाई
शहरातअतमिहत्वाच्या व्यक्तींची रेलचेल राहणार असल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या राहणाऱ्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांना त्यांच्या गाड्या लावण्यास पोलिसांनी मनाई केली आहे. संबधीत पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पोलिसांनी तशा सुचना खाद्यपदार्थ विक्रेत्यांना दिल्याचे रेल्वे स्टेशन चौकातील एका खाद्य पदार्थ विक्रेत्याने सांगितले.

या मंत्र्यांची राहणार प्रमुख उपस्थिती
शुक्रवारी(दि.१०) नितीन गडकरी, राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार दत्ता मेघे, खा.आनंदराव अडसूळ, खा.संजय धोत्रे, खा. विजय दर्डा यांच्या उपस्थितीत कृषी प्रदर्शनाचे उदघाटन होणार आहे. सायंकाळी वाजता वस्त्रोद्योग धोरणाच्या संदर्भात गडकरी यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीला राज्याचे सहकार वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री विजय देशमुख, उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे, नगरविकास राज्यमंत्री डॉ.. रणजीत पाटील उपस्थित राहणार आहे. शनिवारी(दि.११ ) मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस कृषीविकास प्रदर्शनाला भेट देणार आहे. यावेळी परविहन मंत्री दविाकरराव रावते, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, सहकार मंत्री चंद्रकांत पाटील, नगरविकास राज्यमंत्री डॉ.. रणजीत पाटील आणि खासदार अजय संचेती उपस्थित राहतील.समारोपीय कार्यक्रमाला सोमवारी(दि.१३ ) केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, खा.भावना गवळी, अविनाश पांडे, प्रतापराव जाधव यांची उपस्थिती लाभणार आहे.