आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Many Mistake In Election List Issue At Amravati, Divya Marathi

यादीत घोळ;‘श्री.’ना ‘सौ.’ तर ‘सौ.’ना केले ‘श्री.’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- कर्तव्यावर नसलेल्या व मृत्यू पावलेल्या कर्मचार्‍यांची नावे निवडणूक कार्यासाठी पाठवल्याची बाब गंभीर असतानाच आता यादीमध्ये पुरुष कर्मचार्‍यांच्या नावापुढे ‘सौ.’, तर स्त्री कर्मचार्‍यांच्या नावापुढे ‘श्री.’ संबोधन लागल्याचे निदर्शनास आले आहे. यामध्ये 108 महिला व 58 पुरुष कर्मचार्‍यांचा समावेश आहे. चूक दुरुस्त करून घेण्यासाठी कर्मचार्‍यांना निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे चकर्‍या घालण्याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

जिल्ह्यातील वर्धा आणि अमरावती लोकसभा मतदारसंघातील निवडणूक कार्यासाठी शासकीय, निमशासकीय कार्यालयांतील कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील तब्बल 24 हजार कर्मचार्‍यांची यादी सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांकडून विविध विभागांना देण्यात आले होते. ही यादी पाठवताना विभागांकडून विशेष खबरदारी घेतली गेली नाही. तब्बल 108 महिला कर्मचार्‍यांच्या नावापुढे ‘श्री.’ लावण्यात आले, तर 58 पुरुष कर्मचार्‍यांच्या नावापुढे ‘सौ.’ लावण्यात आले. संगणक प्रणालीच्या साहाय्याने महिला व पुरुष कर्मचार्‍यांची नावे वेगळी करताना महिला कर्मचार्‍यांनादेखील बाहेरगावी जाणार्‍या निवडणूक पथकात पाठवण्याबाबत आदेश निर्गमित झाले. एवढेच नव्हे तर त्यांना कर्तव्याच्या ठिकाणापासून दूरवरच्या गावामध्ये नियुक्ती देण्यात आली. ती रद्द करण्यासाठी अनेकांनी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) मोहन पातूरकर यांच्याकडे धाव घेतल्यानंतर नावातील घोळ पुढे आला. जिल्ह्यातील विविध कार्यालयाकडून नावे पाठवताना झालेल्या चुकीचा फटका कर्मचार्‍यांना व यंत्रणेलादेखील बसत आहे.

अनेकांना मिळाले दोन ठिकाणचे आदेश
अनेक कर्मचार्‍यांच्या दोन ठिकाणी हजर राहण्याचे आदेश निघाले आहेत. त्यामुळे नेमके कोठे जावे, असा प्रo्न त्यांच्यापुढे आहे. अशा स्वरूपाच्या तब्बल आठ ते दहा तक्रारी अध्र्या तासात सहायक निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे येत आहेत. निवडणूक कार्य प्रथम प्राधान्यामध्ये मोडत असल्याने घोळ निस्तरण्यासाठी कर्मचार्‍यांना धावपळ करावी लागत आहे. त्यामुळे त्यांचे मूळ काम मागे राहिले आहे.

महिला कर्मचार्‍यांची स्थानिक ठिकाणीच नियुक्ती
निवडणूक कार्यासाठी महिला कर्मचार्‍यांना बाहेरगावी पथकामध्ये पाठवले जाणार नाही. आवश्यक असलेल्या मतदान केंद्रांवर स्थानिक महिला कर्मचार्‍यांना तैनात केले जाणार आहे. निवडणूक कार्यासाठी तैनात महिला कर्मचार्‍यांनादेखील मतदानाच्याच दिवशी कर्तव्य पार पाडावे लागेल. त्यामुळे जिल्ह्यातील कमाल 300 महिला कर्मचार्‍यांनाच निवडणूक कार्यासाठी तैनात राहावे लागेल.