आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Gazal News In Marathi, Dr.Rajesh Umale, Divya Marathi, Amravati

डॉ. उमाळेंनी साकारली मराठी गझलेची स्वरलिपी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - अस्सल उर्दूचा साज ल्यालेल्या गझलेला मराठीत अजरामर करणार्‍या कविश्रेष्ठ सुरेश भट यांच्यानंतर अमरावतीत पुन्हा एक नाव चर्चेत आले आहे. या व्यक्तीने केवळ गझल लिहिलीच नाही, तर अनेक जण गझल लिहू शकतील असे तंत्र शोधून काढले आहे.


असे तंत्र शोधणार्‍या या कलाकाराचे नाव आहे प्रा. डॉ. राजेश उमाळे. त्यांनी हे तंत्र ‘निवडक मराठी गझलांची स्वरलिपी’ या नावाने सर्वांसाठी उपलब्ध केले आहे. जगभर व्याप्ती असलेल्या सुरेश भटांचे मूळ अमरावतीत होते आणि अगदी तरुण असलेल्या या कलाकार-लेखकाचे मूळही अमरावती जिल्हाच आहे.


मराठी गझल लिहिताना खूप कस लागतो. त्यामुळे भल्याभल्यांना गझलेचा नाद सोडून द्यावा लागतो. त्यामुळेच की काय, सुरेश भट व इलाही जमादार यांच्यानंतर या प्रांतात फारशी नावे चर्चिली जात नाहीत. गझलनवाज भीमराव पांचाळेंसारखा गायक जरूर त्यानिमित्ताने नजरेत तरळतो. परंतु, गझलकार म्हणून कुणाचे नाव पुढे आल्याचे ऐकिवात नाही. ही नेमकी अडचण सोडवण्याच्या दृष्टिने डॉ. राजेश उमाळे यांनी हा खटाटोप केला आहे. महाराष्ट्रात अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग आहे. या ‘स्वरलिपी’मध्ये 1951 सालातील मराठी गझल गायकीचा उद्गम ते आजपर्यंतच्या विकासाचा धांडोळा आहे. डॉ. उमाळे यांनी विविध 17 प्रकरणांमध्ये ही मांडणी केली आहे. अर्थात सुरेश भटांच्या गाजलेल्या गझलांपैकी 17 गझलांची व्याकरणनिहाय फोड करून त्यांनी या विषयाची उकल केली आहे. गझलसम्राट सुरेश भट यांच्या जयंतीनिमित्त अशा कलाकाराच्या या साहित्याची आठवण होते.


माजी राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव
गझलेच्या प्रांतातील या पहिल्यावहिल्या प्रयत्नाचे कौतुक माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतीभाताई पाटील यांनी केले. त्यांच्या हस्ते डॉ. उमाळे यांना पुरस्कृत केले गेले. माजी शिक्षण सहसंचालक भोजराज चौधरी यांच्यासारख्या कसदार कलाकाराने ‘स्वरलिपी’ची प्रस्तावना लिहिली आहे.