आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • March Ending News In Marathi, Offices S Work Fast Because Of March Ending, Divya Marathi

टॅक्स, व्हॅटसाठी चाललीय लगबग, बोटांवर मोजण्याइतकेच वापरताहेत ऑनलाइन सेवा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- फेब्रुवारीच्या उत्तरार्धात सर्वच संस्थांना वेध लागतात ते आर्थिक हिशेबाच्या जुळवाजुळवीचे. अमरावतीच्या जवळपास सर्वच शासकीय आणि खासगी संस्थांमध्ये सध्या ही लगबग सुरू आहे. त्यामुळे फेब्रुवारी संपायच्या आत हातची आर्थिक कामे उरकण्याची धावपळ सध्या दिसून येत आहे.

गल्लीबोळात असलेल्या छोट्या किराणा दुकानांपासून विभागीय आयुक्तालयापर्यंत सर्वच कार्यालयांमध्ये आर्थिक हिशेब जुळवण्याचे काम सुरू झाले आहे. येणारा महिना प्रचंड मनस्तापाचा असल्याने जिल्हा कोशागार, बँक, विमा कंपन्या, व्यावसायिक प्रतिष्ठाने, कारखाने, उद्योग, लघुउद्योग, बिल्डर, इंजिनीअर, डॉक्टर, हॉटेल व्यावसायिकांवरही आर्थिक अंकेक्षणासाठी कामाचा ताण वाढला आहे.

महापालिका, जिल्हा परिषद, विद्यापीठातही गेल्या आर्थिक वर्षातील अर्धवट कामे पूर्ण करण्याची घाई सुरू आहे. लवकरच या तीनही संस्थांचा नवा अर्थसंकल्प सादर होणार आहे. विभागीय स्तरावरील सर्वच कार्यालयांतील अंकेक्षक, वित्त व लेखाधिकारी, लेखा परीक्षकांच्या मार्च, एप्रिल महिन्यातील सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत.

तंत्रज्ञानाचा वापर वाढतोय
ऑनलाइन पेमेन्ट करणार 24,512
ऑनलाइन पेमेन्ट करणार 10,325
ऑनलाइन फॉर्म 16,542
ऑनलाइन फॉर्म 10,325
बँक पेमेन्ट करणारे 15,958
बँक पेमेन्ट करणारे 15,458
पारंपरिक फॉर्म भरणारे 10,325
पारंपरिक फॉर्म भरणारे 12,545