आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अठराविश्व दारिद्र्याने घेतला अल्पभूधारक गजाननचा बळी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(गजानन मांगुळकरच्या निधनानंतर एकाकी पडलेले कुटुंब)
राजुराबाजार- घरात आठराविश्व दारिद्र्ये...कुटुंब जगविण्यासाठी रोजची लढाई...आईला कॅन्सर, वडिलांना पक्षपात...मुलांच्या शिक्षणाचा खर्च...मुलावर झालेल्या तीन शस्त्रक्रियेनंतर त्याला जगवण्याची धडपड, अशा परिस्थितीत प्रपंचाचा गाडा हाकत असताना आस्मानी संकटानेही घेरल्यामुळे खचलेल्या अल्पभूधारक गजानन मांगळूकर या युवा शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळले होते.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तालुक्यात सुरू केेलेल्या शेतकरी कर्जमुक्ती संघर्ष यात्रेचा समोराप ३० मे रोजी याच अमडापूर येथे आत्महत्याग्रस्त मांगूळकर कुटुंबीयांच्या घरासमोर केला. दरम्यान, या शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांना कपडे आणि त्यांच्या शिक्षणाच्या जबाबदारीशिवाय ठोस अशी कोणतीही मदत त्यांना करण्यात आलेली नाही. या संघर्षयात्रेच्या माध्यमातून मांगूळकर आत्महत्याग्रस्त कुटुंबाकडे शासन-प्रशासनाचे लक्ष वेधन्याचा प्रयत्न केला गेला. परंतु, यानंतर अजूनही शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून घेणारा नेता किंवा शासकीय अधिकारी या कुटुंबाच्या मदतीसाठी धाऊन आला नाही.
सततची नापिकी, शेतकऱ्यांच्या शेतमालाला नसलेले भाव, निर्ढावलेली प्रशासकीय यंत्रणा, सरकारची अनास्था यामुळे शेतकरी आत्महत्येत गजाननच्या दुर्देवी मृत्यूने भर घातली. ही हत्या की आत्महत्या हा संशोधनाचा विषय असला तरी, दोन मुलांच्या डोक्यावरील छत्र, तर दीपिकाच्या कुंकवाचा धन गेला. गजाननच्या जाण्याने त्याच्या पश्चात संपूर्ण मांगूळकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
मायबाप शासन अश्रू पुसणार काय‌‌?
मांगूळकर कुंटुंबाकडे चार एकर शेती आहे. शेतात २०० झाडे संत्र्यांची होती. मात्र, निसर्गाचा लहरीपणा आणि नापिकीमुळे अमडापूरचा युवा शेतकरी गजाननने आत्महत्या केली. आठ लाख रुपयांचे कर्ज त्यांच्यावर होते. दीपिका गजानन मांगूळकर यांची १५ हजार रुपयांची पोत एका सराफाकडे आणि सोन्याच्या बागड्या वरुड येथील अरविंद बँकेमध्ये ३५ हजार रुपयांमध्ये गहाण ठेवल्याचे दीपिका मांगूळकर यांनी "दिव्य मराठी' बोलताना सांगितले.
खासदार राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांनी मांगूळकर कुटुंबाला भेट देऊन मदतीचे आश्वासन दिले असून, मायबाप शासन या कुटुंबाचे आश्रू कधी पुसणार, असा प्रश्न येथील ग्रामस्थांकडून उपस्थित होत आहे.
नापिकी, कर्जामुळे मृत्यूला केले जवळ
गजानन मांगूळकरकडे फायनन्स कंपनीसह नातेवाइकाकडून घेतलेले कर्ज असे एकूण आठ लाख रुपयांचे कर्ज होते. आधीच गहान असलेली वडीलोपार्जित जमीन घरही गहान होते. मात्र, सततची नापिकी, कर्जबाजारीपणामुळे गजानन पुर्णत: खचला होता. त्यामुळे गजाननने कीटकनाशक औषध प्राषन करून जगाचा निरोप घेतला. त्याच्या जाण्याचे दु:ख असाय्य झाल्याने गजननच्या वडीलांनीही मृत्यूला जवळ केले. सध्या पत्नी दीपिका, पाच वर्षांचा शिवम, तीन वर्षांची दिव्या यांना मोठ्या आधाराची गरज ग्रामस्थाकडून व्यक्त होत आहे.