आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marks Case: Pre Vice Chancellor Tidake Met Deputy Commissioner

गुणवाढ प्रकरण: विद्यापीठाकडून पोलिसांवर 'प्रेशर', प्र-कुलगुरू तिडके यांनी घेतली उपायुक्त घार्गे यांची भेट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - विद्यापीठातीलगुणवाढ प्रकरणात माहिती घेण्यासाठी मंगळवारी उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी कुलगुरू डॉ. खेडकर यांना बोलावले होते. मात्र, ते आले नाहीत. याउलट बुधवारी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जयकिरण तिडके स्वत:हून उपायुक्तांकडे आले
.
पोलिसांच्या या कारवाईमुळे मूल्यांकन विभागातील कर्मचारी, अधिकाऱ्यांनी आम्हाला कामबंदचा इशारा दिला आहे, असे त्यांनी उपायुक्तांना सांगितले. यानंतर आता विद्यापीठ गुणवाढ प्रकरणात पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा शिक्षण क्षेत्रात दिवसभर रंगली होती. गुणवाढ प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत आठ जणांना अटक केली आहे. त्यामध्ये मास्किंग विभागातील तीन कंत्राटी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. याच प्रकरणात आणखी काही माहिती जाणून घेण्यासाठी उपायुक्त घार्गे यांनी मंगळवारी कुलगुरूंना आयुक्तालयात बोलावले होते. पण त्यांनी स्वत: हजर राहता कुलसचिवांना पाठवले. परीक्षा आणि कुलसचिवांचा काहीच संबंध नसतो, त्यामुळे कुलसचिव आले आणि त्यांनी उपायुक्तांपुढे येताच आपल्याला या प्रकरणाबद्दल काहीच माहिती नाही, असे सांगून हात झटकले. बुधवारी सकाळी उपायुक्तांच्या कक्षात प्र-कुलगुरू डॉ. तिडके आले. मास्किंग विभागातील तीन कंत्राटी अधिकाऱ्यांच्या अटकेमुळे विद्यापीठातील मूल्यांकन विभागात भीतीचे वातावरण आहे. असे सांगत त्या विभागातील कर्मचारी अधिकाऱ्यांनी विद्यापीठ प्रशासनाला निवेदन देत पोलिसांची कारवाई सुरू राहिली, तर कामबंद करू, असा इशारा दिल्याची माहिती डॉ. तिडके यांनी पाेलिसांना दिली.

पोलिस या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊन मोठे मासे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, तिडके यांनी उपायुक्तांना जी ‘व्यथा’ सांगितली, ती पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न असावा, अशी चर्चा सुरू होती.

...तर निवेदन द्यावे
आम्हीगुणवाढ प्रकरणात आतापर्यंत केलेल्या तपासात कोणालाही शंका असेल, तर त्यांनी आम्हाला निवेदन द्यावे, न्यायालयात जावे. प्र-कुलगुरू डॉ. तिडके भेटले. पोलिसांच्या कारवाईमुळे मूल्यांकन विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी कामबंदचा इशारा दिला असल्याचे ते म्हणाले. यामुळे आमचा तपास थांबणार नाही किंवा भरकटणार नाही. जे दोषी असतील ते समोर येतील त्यांच्याविरुद्ध कारवाई होणारच आहे. सोमनाथघार्गे, पोलिस उपायुक्त.