आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marks Case: Vice Chancellor Not Present For Investigation

गुणवाढ प्रकरण: चौकशीला कुलगुरूंची दांडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: चाैकशीनंतर पाेलिस अायुक्तालयाबाहेर पडताना कुलसचिव दिनेश जाेशी.
अमरावती - संतगाडगेबाबा अमरावती विद्यापीठात सध्या गाजत असलेल्या गुणवाढ घोटाळाप्रकरणी पोलिसांनी बजावलेल्या चौकशी नोटिशीला बगल देत कुलगुरू डॉ. मोहन खेडकर मंगळवारी (दि. ३१) पोलिस आयुक्तालयात गैरहजर राहिले. कामात व्यस्त असल्याचे कारण पुढे करत त्यांनी कुलसचिव दिनेश जोशी, विधी अधिकारी एम. एम. जायले उपकुलसचिव विक्रांत मालवीय यांना पोलिसांकडे पाठवले.

प्रवास भत्त्याच्या प्रकरणानंतर पोलिसांसमोर जाण्याची कुलसचिव दिनेश जोशी यांची ही दुसरी वेळ होती. पोलिस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांच्या कक्षात विद्यापीठाच्या अधिका-यांची चौकशी करण्यात आली. विशेष म्हणजे, कुलसचिव हे प्रशासकीय प्रमुख असल्यामुळे परीक्षा विभागातील कामकाजाबद्दल त्यांना पोलिसांना उत्तर देता देता एसी कक्षातही चांगलाच घाम फुटला होता. परीक्षा नियंत्रक डॉ. जे. डी. वडते हे या प्रकरणी सुरुवातीपासूनच पोलिसांना सहकार्य करीत आहेत. परंतु, वडिलांच्या निधनामुळे ते मंगळवारी उपस्थित राहू शकले नाहीत. पोलिसांनीही डॉ. वडते यांना त्यामुळे बोलावण्याचे टाळले.

१२५पैकी पाच कंत्राटी कर्मचा-यांना काढले
विद्यापीठाच्यागोपनीय विभागात कार्यरत १२५ पैकी पाच कंत्राटी कर्मचा-यांना काढल्याचे जोशी यांनी सांगितले. विद्यापीठात मनुष्यबळच नसल्याने हा संपूर्ण प्रकार होत आहे. विद्यापीठाला हजार मनुष्यबळाची आवश्यकता असताना केवळ ४१५ जण कार्यरत आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

प्र-कुलगुरूंनाविचारणा नाही : परीक्षाविभागाचे सर्वेसर्वा म्हणून प्र- कुलगुरूंकडे एकमेव जबाबदारी असते; परंतु त्यांना पाठवण्याऐवजी प्रशासकीय प्रमुख असलेल्या कुलसचिवांना चौकशीसाठी पाठवण्याचा अजब फंडा विद्यापीठ प्रशासनाने मंगळवारी वापरला.
पुढे काय : परीक्षाविभागातील हा घोटाळा आहे. कुलसचिव हे प्रशासकीय प्रमुख आहेत. त्यामुळे ते परीक्षा प्रणालीबद्दल फारसे सांगू शकले पोलिसांचे समाधान करू शकले, असे आजच्या चौकशीवरून वाटत नाही. त्यामुळे रजेवरून परत आल्यानंतर पोलिस या प्रकरणी परीक्षा नियंत्रक डॉ. जे. डी. वडते यांची मदत घेतील, असे संकेत आहेत.

चाैकशीनंतर पाेलिस अायुक्तालयाबाहेर पडताना कुलसचिव िदनेश जाेशी.

मूल्यांकनासंदर्भात केली विचारपूस
प्रशासकीयअधिकारी असल्याने या प्रकरणाबद्दल मला माहीत नाही. कुलगुरू कन्या गुणवाढ प्रकरणाबद्दल कुलगुरू हेच प्रतिक्रिया देऊ शकतील, त्यासंदर्भात बोलणे संयुक्तिक नाही. कुलगुरू कामात व्यस्त असल्याने त्यांनी मला पाठवले. मूल्यांकन कशा पद्धतीने होते, त्याचा इतिहास कसा, नियुक्ती कोण करतो आणि स्पॉट मूल्यांकन कसे होते, याबाबत पोलिस उपायुक्तांनी विचारपूस केली. मूल्यांकनात काय घोटाळा झाला, याची माहिती नसल्याने यासंदर्भात मी काेणतीही प्रतिक्रिया देऊ शकत नाही. दिनेशजोशी, कुलसचिव

पुन्हा बोलावणार
कुलगुरू डॉ. खेडकर यांनी कुलसचिव जोशी यांना चौकशीसाठी पाठवले. परंतु ते प्रशासकीय अधिकारी असल्याने पोलिसांना जी माहिती पाहिजे ती त्यांच्याजवळ नाही. प्रकरणाची संपूर्ण माहिती कुलगुरूंकडूनच मिळेल. त्यामुळे त्यांना पुन्हा पत्र देऊन बोलवले जाईल. विद्यापीठात त्रुटी नसून, त्या ठिकाणी मोठे भगदाड आहे. यांपैकी केवळ बीबीए अभियांत्रिकीचेच १२ पेपर कसे निघाले, याचे उत्तर कोणाजवळच नाही. या प्रकरणात आणखी धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे. सोमनाथघार्गे, पोलिस उपायुक्त.

सीसीटीव्हीचे ‘ते’ फुटेज गेले कुठे?
जानेवारीपूर्वीचेसीसीटीव्ही फुटेज सेव्ह केले नसल्याचे घार्गे यांनी सांगितले. त्या दिशेनेही तपास सुरू आहे. नेमके त्याच कालावधीतले फुटेज का सेव्ह नाहीत, याचा तपास सुरू आहे. या प्रकरणात इतर फॅकल्टीच्या विषयांचे पेपर असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे घार्गे यांनी सांगितले.