आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marks Increase Case : Vice Chancellor Put His Side Before Police

विद्यापीठ पाेलिसांच्या दारी,गुणवाढ प्रकरणात कुलगुरूंनी मांडली पोलिसांसमोर कर्मचाऱ्यांची व्यथा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - गुणवाढ प्रकरणात तुम्ही सखोल तपास करा, आम्हीसुद्धा तुम्हाला सहकार्य करतो; मात्र यामुळे अधिकारी, कर्मचारी घाबरल्याची व्यथा शुक्रवारी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मोहन खेडकर यांनी पोलिस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांच्यासमोर मांडली.

पोलिसांनी गुणवाढ प्रकरणात माहिती घेण्यासाठी मंगळवारी (दि. ३१ मार्च) कुलगुरू डॉ. खेडकर यांना बोलावले होते. मात्र, मंगळवारी कुलगुरू येता त्यांनी कुलसचिव दिनेशकुमार जोशी यांना पाठवले होते. त्यानंतर मास्किंग विभागातील कंत्राटी अधिकाऱ्यांना अटक झाली मूल्यांकन विभागातील कर्मचारी, अधिकाऱ्यांनी कामबंद केले. त्यामुळेच शुक्रवारी कुलगुरूंसह कुलसचिव जोशी, प्राचार्य एफ. सी. रघुवंशी यांच्यासह अन्य अधिकारी पोलिस उपायुक्त घार्गे यांना निवेदन देऊन चर्चा करण्यासाठी आले होते. मूल्यांकन विभागातील कामबंद असल्यामुळे याचा फरक पुढील निकालावर पडणार आहे. पर्यायाने ही बाब विद्यार्थ्यांच्या प्रगतीला बाधक ठरणारी आहे. पोलिसांच्या कारवाईमुळे सर्व कर्मचारी अधिकारी घाबरले आहेत, असे त्या निवदेनात नमूद आहे. आम्ही तपास करताना कोणत्याही व्यक्तीला त्रास देत नाही. ज्यांचा दोष आहे, त्यांच्यावर कारवाई केली आहे किंवा तपासादरम्यान जे दोषी असतील, त्यांच्याविरुद्ध कारवाई होईलच; याचा अर्थ विद्यापीठातील सर्वच दोषी आहेत, असा नाही, असे साेमनाथ घार्गे कुलगुरूंना म्हणाले. धास्तीमुळे मूल्यांकन विभागातील कर्मचारी, अधिकारी कामावर येत नाहीत.