आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाहितेचे अपहरण करून 2 लाखांत विक्री; लग्‍न लावणा-या दोघांना कारावासाची शिक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- सहा वर्षांपूर्वी शहरातील एका 22 वर्षीय विवाहितेचे अपहरण करून तिची राजस्थानात दोन लाख रुपयांमध्ये विक्री दुसरे लग्न लावण्यास बाध्य केल्याप्रकरणी दाेघांना येथील जिल्हा सत्र न्यायाधीश (क्रमांक 1) ओ. पी. जयस्वाल यांच्या न्यायालयाने पाच वर्षांचा कारावास हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली, तर दोघांची निर्दोष मुक्तता केली.
मो. हाशम मो. हातम (40 ,रा. फ्रेजरपुरा) आणि एक महिलेला न्यायालयाने गुरुवारी (दि.29) शिक्षा सुनावली. तर जुगदराम संताराम जाठ (60, अजरासर, नागोर, राजस्थान) हरकरण ऊर्फ मोती मेवाराम गुजर (50, रा. बशक्ता, जयपूर राजस्थान ) यांची निर्दोष सुटका केली.
मो. हाशम याचा कॅटरींगचा व्यवसाय होता. त्याच्याच कॅटरींगमध्ये मायानगरात राहणारी एक महिला काम करत होती. त्या महिलेच्या घरात ही 22वर्षीय विवाहिता भाड्याने राहत होती. त्या महिलेसोबत ही विवाहितासुद्धा कॅटरींगच्या कामासाठी जात होती. 15 जानेवारी 2009 रोजी मो. हाशम त्या महिलेने विवाहितेला आपल्याला कॅटरींगच्या कामासाठीच बाहेरगावी जायचे आहे,असे सांगून हे दोघे जण तिला राजस्थानमधील जुगदराम जाठ याच्या घरी पोहचले. जाठकडून मो. हाशम त्या महिलेने 70 हजार रुपये घेतले. त्यानंतर जाठने हरकरण गुजरच्या मदतीने पुन्हा याच विवाहितेला राजस्थानमधील केमरी येथे राहणाऱ्या हरकेशसिंग चिंतामणी कडान्ना याच्याकडून लाख ३० हजार रुपये घेतले. त्यानंतर जाठच्याच घरी हरकेशसिंगसोबत त्या विवाहितेचे दुसरे लग्न लावून देण्यात आला. त्यानंतर मायानगरमधील ती महिला मो. हाशम अमरावतीत परतले. दुसरीकडे मुलीच्या शोधात तिची आई मायानगरातील महिलेकडे गेली. त्यावेळी त्या महिलेने तुझी मुलगी बहीरमला गेली आहे, तीन दिवसाने येईल,असे सांगितले. त्यामुळे त्या विवाहितेच्या आईने बहीरमला शोध घेतला मात्र ती मिळून आली नाही. दरम्यान, मायानगरमधील ती महिला पसार झाली. या प्रकरणी गोलमाल असल्याचा अंदाज आल्यामुळे विवाहितेच्या आईने 19 फेब्रुवारी 2009 रोजी राजापेठ पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी पाच जणांविरुध्द फुस लावून पळवून नेल्याचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी हरकेशसिंग वगळता उर्वरित चौघांनाही अटक करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. सरकारी पक्षाकडून अॅड. प्रकाश शेळके यांनी युक्तिवाद केला.