आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mass Copy News In Marathi, Tenth Examination, Divya Marathi

दहावी, बारावीच्या परीक्षेत कॉपीची 176 प्रकरणे उघड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - दहावी, बारावीच्या परीक्षेत विभागात आतापर्यंत 176 कॉपीप्रकरणे घडली आहेत. दहावीचे 111, तर बारावीचे 65 विद्यार्थी परीक्षेदरम्यान गैरप्रकार करताना पकडले गेले. दोन्ही परीक्षांत कॉपी प्रकरणांमध्ये अमरावती जिल्हा सर्वोच्च स्थानी असल्याचे बोर्डाने दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.


परीक्षा मंडळाने स्थापन केलेले भरारी पथक तसेच केंद्राध्यक्षांकडून कॉपीबहाद्दरांवर कारवाई करण्यात आली आहे. भरारी पथकाच्या धाडीतून सर्वाधिक गैरप्रकार उघडकीस आले आहेत. दरम्यान, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने सुरू असलेली दहावी व बारावीची लेखी परीक्षा अंतिम टप्प्यात आली आहे. 27 मार्चला दहावी, तर 29 मार्चला बारावीची परीक्षा संपणार आहे. दहावीसाठी विभागातून एक लाख 85 हजार 142, तर बारावीला एक लाख 22 हजार 229 परीक्षार्थी आहेत. दहावीच्या परीक्षेसाठी 727 आणि बारावीसाठी 476 परीक्षा केंद्रे आहेत. दरम्यान, कॉपीमुक्त अभियानावर या कॉपी प्रकरणामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


परीक्षा अंतिम टप्प्यात
दहावी व बारावीची परीक्षा अंतिम टप्प्यात आहे. अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. बुधवारी (दि. 26) बारावीचा डिफेन्स स्टडी हा पेपर होणार आहे. विभागातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद व राळेगाव अशा दोन, तर अकोला जिल्ह्यात एका परीक्षा केंद्रावर पेपर घेण्यात येईल. 27 ते 29 एप्रिल दरम्यान आयटीची ऑनलाइन पद्धतीने परीक्षा असेल.