आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mayawati News In Marathi, Amravati, Lok Sabha Election, Bahujan Samaj Party

दहा वर्षांनंतर मायावतींची अमरावतीत सभा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती गुरुवारी (दि. 27) अमरावतीत येत असून, तब्बल दहा वर्षांनतर त्यांची शहरात सभा होत आहे. सभेसाठी मोठा जनसमुदाय उपस्थित राहण्याची शक्यता बघून सायन्सकोर मैदानावर तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सुरक्षेचे कडक नियम लागू करण्यात आले आहेत.
मायावतींना असलेला झेड प्लस सुरक्षेचा दर्जा लक्षात घेऊन पोलिसांनी सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन केले आहे. सभास्थळी हँडबॅग, पर्स तसेच पाण्याच्या बॉटल नेण्यास मज्जाव करण्यात आला आहे. या वस्तू बाळगणार्‍यांना सभास्थळी प्रवेश दिला जाणार नाही.


मायावती दहा वर्षांनंतर अमरावतीत येत असून, त्यांच्या गुरुवारच्या सभेसाठी संपूर्ण व्यासपीठ वातानुकूलित राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मायावतींची ही राज्यातील पहिलीच सभा आहे. ती दुपारी 12 वाजता सुरू होणार असल्याचे समजते. या वेळी संपूर्ण विदर्भातील लोकसभेच्या रिंगणातील 10 उमेदवारांसह नागरिकही येणार आहेत. सभास्थळी दहा हजार खुच्र्यांची व्यवस्था केली असून, कडेकोट सुरक्षा व्यवस्था राहणार आहे.


सभास्थळी तगडा बंदोबस्त
मायावतींची सभा सायन्सकोरवर होणार आहे. सभेला होणारी गर्दी आणि सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर एक उपायुक्त, सहा पोलिस निरीक्षक, सहा सहायक पोलिस निरीक्षक, 11 पोलिस उपनिरीक्षक तसेच 150 पुरुष पोलिस कर्मचारी आणि 30 महिला कर्मचारी तैनात राहणार आहेत. विजय साळुंके, ठाणेदार, शहर कोतवाली पोलिस ठाणे.