आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हाय प्रोफाइल’ आमरवाती ठरणार महापौरपदाची निवडणूक!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- राष्ट्रवादीकाँग्रेस गटनेतेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने स्थगनादेश दिल्यानंतर महापालिकेतील राजकीय घडामोडी झपाट्याने बदलल्या आहेत. गटनेतेपदाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे कोणत्या गट नेत्याचा व्हीप स्वीकारावा, याबाबत सदस्यांमध्ये संभ्रम असणार आहे. प्रकरणाबाबत अद्याप निर्णय झाला नसल्यामुळे सुनील काळे, अविनाश मार्डीकर या दोन्ही गटनेत्यांकडून व्हीप जारी होण्याची शक्यता आहे. जयश्री मोरय्या चरणजित कौर नंदा हे दोन्ही उमेदवार रिंगणात कायम राहणार असल्याचे संकेत असून, यांपैकी कुणाला मतदान करावे, याबाबत एनसीपी फ्रंटमधील सदस्यांमध्ये संभ्रम कायम राहणार आहे.
महापालिका निवडणुकीनंतर आमदार रावसाहेब शेखावत एनसीपी फ्रंटच्या वतीने माजी आमदार सुलभा खोडके यांच्यादरम्यान सत्ता वाटपाबाबत करार झाला होता. मुळात, पालिकेतील काँग्रेसची आघाडी राष्ट्रवादी काँग्रेससाेबत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीतदेखील काँग्रेसकडून राकाँ उमेदवाराला मदत करण्याची अधिक शक्यता आहे. गटनेते प्रकरणात विभागीय आयुक्तांनी निर्णय दिल्यानंतर सुनील काळे यांच्या नावाची सभागृहात घोषणा करतेवेळी काँग्रेसने मदत केल्याचे उदाहरण ताजे आहे. शिवाय, आगामी विधानसभा निवडणुकीदरम्यानदेखील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी राहणार आहे. पालिकेत नामांकन दाखल करण्याची धामधूम सुरू असताना याच पार्श्वभूमीवर आमदार रवि राणा, उपमहापौर नंदकिशोर वऱ्हाडे काँग्रेसच्या संकटमोचकांदरम्यान बैठक झाल्याचे वृत्त आहे. निवडणुकीदरम्यान परिस्थिती स्फोटक होण्याची शक्यता असल्यामुळे प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत. या स्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचे पारडे जड राहणार आहे. मात्र, काँग्रेसचे २९ आणि सुनील काळे यांच्याकडील सदस्यसंख्या लक्षात घेता महापौरपदासाठी बहुमत प्राप्त करणे कठीण होण्याची शक्यता आहे. शिवाय खोडके गटाच्या चरणजित कौर नंदा लढतीत कायम असल्यास त्यांच्या समर्थकांची मते त्यांना मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये राष्ट्रवादीतील मतांचे विभाजन होणार आहे. काँग्रेसने, राष्ट्रवादी काँग्रेसची साथ दिली तरी संख्याबळ पाहता जयश्री मोरय्या यांचा महापौरपदाचा मार्ग सुकर नाही. सद्य:स्थितीत सुनील काळे यांच्याकडे केवळ सात सदस्य असून, काँग्रेसने मदत केल्यानंतरदेखील त्यांना बहुमताचा आकडा गाठण्यास आणखी पाच ते सहा सदस्यांची गरज भासणार आहे.