आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘जनरेटर’वर पडते पाणी, घडू शकते मोठी हानी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - उपमहापौर कक्षात असलेल्या प्रसाधनगृहातील पाणी जनरेटरवर गळत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. जनरेटर सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले एएमएफ चॅनल असलेल्या खोलीत अगदी विजेच्या उपकरणांवर पाणी गळत असल्याने महापालिकेची सुरक्षा धोक्यात आली आहे. मागील अनेक दिवसांपासून हा प्रकार होत असताना याकडे कोणतेही लक्ष देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील कामांचा खोळंबा होऊ नये म्हणून १४० किलो वॅटचे जनरेटर लावण्यात आले आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर इमारतीबाहेर असलेले जनरेटर आपोआप सुरू व्हावे म्हणून नगर सचिव विभागाच्या बाजूला असलेल्या खोलीमध्ये एएमएफ चॅनल ठेवण्यात आले आहे. वीजपुरवठा पूर्ववत आरंभ करण्यासाठी एएमएफ चॅनलच्या माध्यमातून जनरेटर सुरू होण्यास मदत होते. त्यामुळे खोलीमध्ये उच्च प्रतीचे विद्युत उपकरण इलेक्ट्रॉनिक साहित्य बसवण्यात आले आहे. या विजेच्या उपकरणांवर पाणी गळत असल्याने पालिकेमध्ये कोणत्याही क्षणी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जनरेटर सुरू होण्यासाठी एएमएफ चॅनलमध्ये उच्च प्रतीची ऊर्जा निर्माण होते. त्याआधारे जनरेटर सुरू होण्यास मदत होते. मात्र, पालिकेचे महागडे उपकरण नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे. जनरेटरचे उपकरण असलेल्या खोलीच्या बाजूला नगर सचिव कार्यालय, भांडार विभाग तसेच निवडणूक कार्यालयदेखील आहे.

उच्च क्षमतेचे जनरेटर
पालिकेतीलमुख्य प्रशासकीय इमारतीत वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी उच्च क्षमतेचे जनरेटर लावण्यात आले आहे. येथील जनरेटर १४० के.व्ही. क्षमतेचे आहे. १४० किलो व्हॅट जनरेटर सुरू करण्यासाठी उपयोगी असलेल्या एएमएफ उपकरणास अपघात झाल्यास मोठा आगडोंब उडण्याची शक्यता आहे. जनरेटर असलेल्या परिसरात धोकादायक स्थितीमध्ये कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजवावे लागले.
दस्तऐवज धोक्यात
नगरसचिव निवडणूक विभागात नगरसेवक तसेच विविध ठरावांबाबत महत्त्वपूर्ण कागदपत्रे नेहमीच राहते. त्याचप्रमाणे भांडार विभागात मोठ्या प्रमाणात साहित्य ठेवले जातात. एएमएफ उपकरण नगर सचिव भांडार विभागाच्या अगदी जवळ असलेल्या खोलीमध्ये ठेवण्यात आले आहे. पाझरत्या पाण्यामुळे त्या उपकरणाला घेऊन एखादी दुर्घटना झाल्यास सर्वाधिक नुकसान भांडार विभाग तसेच नगर सचिव विभागातील होण्याची अधिक शक्यता आहे.