आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंधरा मांसविक्रेत्यांवर महापािलकेची कारवाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरात उघड्यावर मांसविक्री करणाऱ्या एकूण पंधरा दुकानदारांवर महापािलकेच्या पथकाने बुधवारी (दि. १०) कारवाई केली. भाजीविक्रेत्यांनाही या कारवाईला सामोरे जावे लागले. या वेळी भाजीपाला हातठेले जप्त करण्यात आले. महापालिका आयुक्त अरुण डोंगरे यांच्या निर्देशांनुसार पशुशल्य अतिक्रमण विभागाच्या पथकाने ही संयुक्त कारवाई केली. या वेळी चोख पोिलस बंदोबस्त होता.
पंचवटी चौक ते आरटीओ कार्यालय मार्गासह शेगाव नाका, टोपेनगर, काँग्रेसनगर रोड या भागात ही धडक कार्यवाही करण्यात आली. उघड्यावरील मांसविक्रीपासून होणारे प्रदूषण दूषित मांसाहारामुळे सार्वजनिक आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम टाळण्यासाठी महापालिका आयुक्त अरुण डोंगरे यांनी पुढाकार घेतला आहे. कारवाईमध्ये सहायक पशुशल्यचिकित्सक डॉ. सचिन बोंद्रे, निरीक्षक उमेश सवाई, अब्दुल रफीक अब्दुल कदीर, अविनाश सारसर, पोलिस कर्मचारी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी सहभागी होते.

स्वच्छतेची घ्यावी काळजी
^अनधिकृतमांसविक्री आणि कत्तलीसंदर्भात शहरात आयुक्तांच्या आदेशानुसार कारवाई सुरू आहे. सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरणावर होणारा परिणाम लक्षात घेऊन शहरात कारवाई करण्यात येत आहे. विक्रेत्यांनी स्वच्छतेबाबत काळजी घ्यावी. डॉ.सचिन बोंद्रे, सहायकपशुशल्यचिकित्सक, महापािलका.
उघड्यावर मांसविक्री करणाऱ्या दुकानदारांचे साहित्य जप्त करण्यात आले.
..अन्यथा विक्रेत्यांवर फौजदारी कारवाई
शहरातीलसर्व मांसविक्रेत्यांनी मांसविक्री करताना स्वच्छता आरोग्याच्या दृष्टीने काळजी घ्यावी. वाहतुकीला अडथळा होणार नाही, पर्यावरण दूषित होणार नाही याची दक्षता घ्यावी; अन्यथा विक्रेत्यांवर फौजदारी कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा आयुक्त अरुण डोंगरे यांनी दिला आहे.