आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवामान खात्याचे भाकीत; पुढील तीन दिवस तुरळक पावसाची शक्यता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेला अरबी समुद्रावरील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे सोमवारपासून (दि. २९) मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त केली जात आहे. यावर्षी मृग नक्षत्रातच पेरणीयोग्य पाऊस बरसल्याने सध्या पेरण्यांची लगबग वाढली आहे. ग्रामीण भागातील शेतकरी सध्या पेरणीच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र जिल्हाभर दिसून येत आहे.
मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने उसंत घेतली आहे. मागील आठवड्यापासून जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे जिल्ह्यातील पेरण्या रखडल्या होत्या. पावसाच्या उसंतीमुळे सध्या जिल्ह्यात पेरण्यांनी वेग घेतला आहे. मागील वर्षी मूग, उडीदासह, कपाशी, तूर, सोयाबीन या प्रमुख पिकांच्या पेरण्या तब्बल महिनाभर उशीरा झाल्या होत्या. त्यामुळे उत्पादनात कमालीची घट होऊन शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली. होती.
यावर्षी मृग नक्षत्रातच पेरणी योग्य पाऊस आल्याने पेरण्या वेळेत होणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहे. त्यातच सध्याच्या पावसाच्या उसंतीने पेरण्यांना वेग आला आहे. जिल्ह्यात आतापर्यत १९ टक्के पेरण्या झाल्या आहेत. दरम्यान, अरबी समुद्र बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाचा पट्टा विदर्भाच्या दिशेने सरकत असल्याने पुढील तीन- चार दिवस तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मात्र, सोमवारपासून मुसळधार पावसाची शक्यता हवामानखात्याने वर्तवली आहे. या पावसामुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या पेरण्यांचा खोळंबा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सोमवारपासून मुसळधार पावसाचा अंदाज