आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जिल्ह्यातील दूध नासलं! ८७ टक्के दूध उत्पादक सहकारी संस्था झाल्या ‘भाकड’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - मरणाच्यादारात उभा असलेल्या शेतक-यांना जगवण्याची ताकद असलेल्या ‘दुधा’ला नासवण्याचेच काम राजकीय शासकीय पातळीवर झाल्याने सद्य:स्थितीत जिल्ह्यातील ८७ टक्के दूध उत्पादक सहकारी संस्था ‘भाकड’ झाल्या आहेत. या संघांच्या मतांच्या भरवशावर केवळ विविध सहकारी संस्थांतील मानाच्या पदांच्या खुर्च्या उबवण्याचेच काम काही बड्या नेत्यांकडून झाले. दरम्यान, सध्या सहकारी दूध क्षेत्रात कायदेशीर ‘सफाई’चे काम हाती घेण्यात आल्यामुळे दिग्गज नेत्यांच्या खुर्च्यांचे पायही मोडण्याचे संकेत दिसून येत आहे. केवळ मतांसाठी जिवंत राहिलेल्या स्थानिक नेत्यांच्या संस्थांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात आल्यामुळे दिग्गज नेत्यांचेही धाबे दणाणले आहेत.

जिल्ह्यात एकूण ४५९ दूध उत्पादक सहकारी संस्था असल्याची नोंद जिल्हा निबंधक (दुग्ध) कार्यालयात आहे. यांपैकी केवळ १३ संस्था सद्य:स्थितीत जिवंत आहेत. २५-३० वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या संस्था सुरळीत चालू असताना शासकीय राजकीय अनास्थेमुळे सध्या डबघाईस आल्या आहेत. यातूनच राजकीय हस्तक्षेपामुळे या संस्थांच्या कारभारात कमालीची अनागोंदी निर्माण झाली. खरेदी-विक्री संस्था, मार्केटिंग फेडरेशन जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दूध सहकारी संस्थांचे प्रतिनिधी निवडून दिले जातात.

या संस्थांमधील जबाबदारीची पदे भूषवण्यासाठीच या दूध संघांचा आतापर्यंत मोठ्या प्रमाणात वापर होत आला. राजकीय वरदहस्तामुळे अनेक वर्षांपासून या दूध संघांचे व्यवहारही तपासण्यात येऊ शकले नाहीत. केवळ कागदोपत्री संघ जिवंत ठेवून स्वार्थासाठी केवळ राजकीय पोळ्या भाजल्या जाऊन शेतक-यांची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी दूध संघ अपयशी ठरले. दरम्यान, गावातील दूध उत्पादक जगावा, यासाठी कोणतीच पावले उचलली गेल्यामुळे आज सहकारी दुग्ध व्यवसाय मोडण्याच्या मार्गावर आहे.
सहकाराचा कणा मोडू नये, यासाठी मागील ४० वर्षांमध्ये राजकारणासोबतच शेतक-यांचे हित लक्षात घेत दूध उत्पादन प्रक्रिया उद्योगवाढीच्या दृष्टीने या नेत्यांनी कार्य केले असते, तर आज जिल्ह्यातील शेतक-यांच्या आर्थिक अवस्थेचे चित्र वेगळे निर्माण झाले असते; परंतु दुर्दैवाने राजकीय स्वार्थापोटी सहकारी क्षेत्रातील धुरिणांकडून दूध सहकारी चळवळीचा बट्ट्याबोळ झाला आहे.

...तर दुधाने तारले असते
जिल्ह्यातीलदूध सहकारी चळवळीला उत्पादन वाढवण्यासाठी सर्व सोयी-सुविधा पुरवण्यात आल्या असत्या, तर मागील तीस-चाळीस वर्षांत शेतक-यांची अर्थव्यवस्था मजबूत होण्यात मदत होऊ शकली असती. परंतु दुर्दैवाने जनावरे, पशुवैद्यकीय सुविधा, चारा, शीतकेंद्र, वाहतूक व्यवस्था आदींबाबत दूरदृष्टीअभावी मार्गदर्शनच होऊ शकल्यामुळे जिल्ह्यात आज दुधाच्या प्रचंड मोठ्या अर्थकारणाचा कणा मोडला आहे. दुग्ध व्यवसायाला चालना मिळणे गरजेचे होते.

केवळ ६० ते ७० संस्था राहणार जिवंत
सहकारीसंस्था कायद्यात झालेले आमुलाग्र बदल त्याची अंमलबजावणी सध्या काटेकोरपणे करणे सुरू झाले आहे. या अंतर्गतच सर्व दूध उत्पादक सहकारी संस्थांची सध्या झाडाझडती सुरू आहे. वर्षानुवर्षे अहवाल, लेखापरीक्षण, निवडणुका आदींबाबत या संघांनी निबंधक कार्यालयात माहितीच सादर केल्याचे सध्या दिसून येत आहे. बहुतांश संस्थांच्या कारभारात अनागोंदी आढळून येत असल्यामुळे कागदपत्रांची पूर्तता करणे या संस्थांना अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे कारवाईच्या बडग्यानंतर जिल्ह्यातील ६० ते ७० दूध उत्पादक सहकारी संस्था जिवंत राहू शकतील, अशी शक्यता विश्वसनीय सूत्रांनी व्यक्त केली आहे.

पुढे काय ?
जिल्ह्यातीलबहुतांश दूध उत्पादक सहकारी संघांना अवसायानाच्या अंतरिम आदेश बजावण्यात आले असले, तरी ही कारवाई अंतिम राहणार नसल्याची भूमिका निबंधक कार्यालयाची आहेे. या संस्थांनी त्रुटींची पूर्तता केल्यास यांना नवसंजीवनी मिळणार आहे. बरखास्तीची कारवाईही झाल्यास याच संघांना नव्या नियमानुसार नवीन दूध उत्पादक सहकारी संस्था स्थापन करण्यास सहकार्य करण्यात येईल.

दुधाचे दरही जबाबदार
दुग्धव्यवसायासाठी जनावरे पाळण्याच्या खर्चात कमालीची वाढ झाली असताना शासकीय दुधाचे भाव अत्यल्प असल्यामुळे दूध चळवळ कोलमडण्यासाठी मदत झाली आहे. केवळ शेतक-यांना मदत करण्यासाठी म्हणून जनावरांचे वाटप केले गेले. परंतु ती जगवण्यासाठी, दूध उत्पादन वाढीसाठी आवश्यक असणा-या इतर पायाभूत सुविधा निर्माण करता आल्याने जिल्ह्यातील दूध संघांवर बरखास्तीची टांगती तलवार उभी आहे.

सुविधांअभावी संस्था बंद
अचलपूरयेथील दूध शीतकरण केंद्र शासकीय दुधाच्या वाहनांची फेरी बंद झाल्यामुळे दूध कुठे विकावे, असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यातही चारा, पशुवैद्यकीय सुविधा, योग्य भाव मिळाल्यामुळे संस्था बंद पडली. देविदासफाटकर, अध्यक्ष, सुदर्शन दूध उत्पादक सह. संस्था, धामणगाव गढी, ता. अचलपूर

...तरबरखास्तीची होणार कारवाई
जिल्ह्यातीलबहुतांश दूध उत्पादक सहकारी संस्थांच्या कारभारात कमालीची अनियमितता आढळल्याने सर्वच संस्थांना त्रुटी पूर्ण करण्यासाठी सध्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्रुटींची पूर्तता झाल्यास या संस्थांवर बरखास्तीची कारवाई करण्यात येणार आहे. सचिनघोडके, विभागीय उपनिबंधक सह. संस्था(दुग्ध)