आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Millions Of Thieves The Electric Wire Help Oneself

लाखोंच्या विद्युत तारांवर चोरट्यांनी मारला डल्ला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परतवाडा- सतततीन दिवस विद्युत तार चोरीला गेल्याने येथील वीज वितरण कंपनीला मोठा फटका बसला आहे. आश्चर्य म्हणजे ३३ केव्हीच्या जिवंत विद्युत वाहिनीवरून ही चोरी करण्यात आली आहे. विद्युत तारेच्या चोरीमुळे परिसरातील गावांचा खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी कार्यकारी अभियंता राजेंद्र गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची चमू प्रयत्न करीत आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या जिवंत विद्युत तारा चोरीच्या तीन दिवसांत तीन घटना घडल्या आहेत. यात विद्युत तार चोरणारी मोठी टोळी असल्याचे परिसरामध्ये बोलल्या जात आहे. या कॉपर तार चोरीमुळे अचलपूर चांदूर बाजार तालुक्यातील ३० ते ४० गावांतील विद्युत पुरवठा बंद असून, शेतातील स्प्रिंकलर लावून चालवलेला प्रयत्नही यामुळे बंद पडला आहे. त्यामुळे शेतातील लाखमोलाचे पीक करपू लागले आहे. चोरीच्या या प्रकारामुळे या भागातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचीही मोठी गैरसोय होत आहे. चोरीला गेलेल्या या तारांमुळे खंडित झालेला वीजपुरवठा नियमित करण्यासाठी वीज वितरण कंपनीचे अधिकारी वीजपुरवठा नियमित करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

अमरावती विद्युत ग्रामीण विभागांतर्गत येणाऱ्या वलगाव सबस्टेशनचे सहायक अभियंता बी. व्ही. काळे यांनी वलगाव पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार, ३० जून जुलै रोजी वलगाव शहराच्या पाच किमी. अंतरापासून मार्की गावापर्यंतची किमीपर्यंतची विद्युत वाहिनी चोरीला गेली. ही तार अमरावती शहराला आपत्कालीन विद्युत पुरवठा करणारी होती. आसेगाव सबस्टेशनवरून येणारी ही तार चोरट्यांनी दोन वेळा चोरून नेली. या तारेची अंदाजे किंमत लक्ष रुपये होती.

जुलै रोजी पूर्णानगर सबस्टेशनअंतर्गत येणाऱ्या आसेगाव ते अमरावती मार्गावरील चापके यांच्या शेतापर्यंतची २.४ किमीची तांब्याची तार चोरीला गेली. याची अंदाजे १०३ टन वजनाच्या या तारेची किंमत लाख ११ हजार अाहे. याबाबत पूर्णानगरचे कनिष्ठ अभियंता चंद्रशेखर श्रीराव यांनी आसेगाव पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

ही घटना होत नाही, तोच दुसऱ्या दिवशी म्हणजेच जुलैला दर्यापूर फाटा ते आसेगाव फाट्यादरम्यानची किमीवरील विद्युत तार चोरीला गेली असून, तिची अंदाजे किंमत लाख ३० हजार रुपये आहे. याबाबत सहायक अभियंता अंकुश ठाकरे यांनी आसेगाव पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. अशाप्रकारे सतत तीन दिवस ही विद्युत तार चोरीला गेल्याने विद्युत कंपनीला मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. या विद्युत तार चोरीच्या प्रकारामुळे शेतकऱ्यांनी शेतात पेरलेले पीक जिवंत ठेवण्यासाठी स्प्रिंकलर सुरू केले. परंतु, विद्युत तार चोरीला गेल्याने वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे नवीन संकट उभे झाले आहे.
विद्युत तारा चोरीला गेल्याने शेतातील पीक मरणासन्न अवस्थेत आले आहे. वरच्याची कृपा नाही, खालचेही जगू देत नाहीत, अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. हनिफअजिज, शेतकरी, येलकी.

विद्युत पुरवठा खंडित झाल्याने शेतातील सिंचनाची व्यवस्था बंद पडली आहे. शेतात पीक उभे कसे करावे, हा प्रश्न पडला आहे. मनोजवाटाणे, शेतकरी, आसेगाव.

पावसाचा पत्ता नाही. कर्ज घेऊन स्प्रिंकलरची व्यवस्था केली. पेरलेले बी जगवण्यासाठी पाणी देणे सुरू केले. खंडित झालेल्या वीजपुरवठ्यामुळे मरावे की जगावे, तेच कळत नाही. धनराजहागोणे, शेतकरी, सावळापूर

आसेगाव पूर्णा सबस्टेशन अंतर्गत लाखोंची विद्युत तार चोरून नेल्याने खंडीत वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धस्तरावर काम सुरू आहे. राजेंद्रगिरी, कार्यकारी अभियंता.
चोरट्यांनी जिवंत विद्युत वाहिनीवरून तार कापून नेली आहे.

विद्युत पुरवठा सुरू करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या मदतीने युद्धस्तरावर काम सुरू आहे.
आसेगाव फाटा ते दर्यापूर फाटा, आसेगाव सबस्टेशन ते पूर्णानगर, वलगाव ते मार्की या ३३ केव्हीच्या वाहिनीवरून कॉपर तार चोरीला गेल्याने वीज वितरण कंपनीचे अभियंतेदेखील आश्चर्य व्यक्त करत आहेत.

हीगावे आहेत अंधारात
३०जून ते जुलै या तीन दिवसांत तीन ठिकाणी जिवंत विद्युत तार चोरीला गेल्याने अचलपूर, चांदूरबाजार तालुक्यातील ३० ते ४० गावांचा विद्युत पुरवठा खंडित झाल्याने आसेगाव, टाकरखेडा, गोविंदपूर, तळणी, तामसवाडी, दहीगाव, कोथ गावंडी, राजना, धानोरा, हिवरा, शाहापूर, चिंचोली, विरुळ, तुळजापूर गढी, कुष्णापूर, रसुलापूर, सर्फाबाद या गावांत अंधाराचे साम्राज्य आहे.