आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिनीट्रक उलटला,एकाचा मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- नागपूरवरूनऔषधी घेऊन अकोल्याकडे जाणाऱ्या एका मिनीट्रकचा टायर फुटून झालेल्या अपघातात मिनीट्रकमधील एकाचा त्याखाली दबून मृत्यू झाला. हा अपघात अमरावती ते बडनेरा एक्स्प्रेस हायवेवर रविवारी (दि. २८) सायंकाळी घडला. या अपघातामुळे हायवेवरील वाहतूक काही वेळासाठी खोळंबली होती.
औषधीनी भरलेला मिनीट्रक (एम. एच. १५ डि. के. ५५६६) एक्सप्रेस हायवेवरुन जात होता. संकेत कॉलनीरा परिसरात ट्रकचा टायर फुटल्यामुळे चालकाचे ट्रकवरून नियंत्रण सुटले. यावेळी ट्रक थेट दुभाजकावर चढला. दुभाजकावरील दिशादर्शकाचे खांब तोडून हा ट्रक उलटला. यावेळी ज्या दिशेने तो जात होता त्याच्या विरुध्द दिशेने पुन्हा त्याचा दर्शनी भाग झाला यावरून ट्रकची गती भरधाव असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या ट्रकमध्ये विविध कंपनीच्या औषधी होत्या.
ट्रक उलटल्यामुळे या सर्व औषधी मुख्य मार्गावर पडल्या होत्या.
टायर फुटल्यानंतर परिसरात मोठा आवाज झाला. त्यामुळे नागरिकांनी हायवेवर धाव घेतली. मात्र ट्रक उचलण्यासाठी क्रेन लवकर पोहचल्यामुळे हा व्यक्ती जवळपास एक ते दीड तास ट्रकखालीच दबून होता. क्रेन आल्यानंतर त्या व्यक्तीला बाहेर काढून इर्विनमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. सायंकाळपर्यंत त्याची ओळख पटली नव्हती.
या अपघातामुळे एका बाजूची वाहतूक बंद झाली होती. वाहतूक शाखेचे एपीआय रवींद्र जेधे, गाडगेनगरचे उपनिरीक्षक संजय पवार आदींनी घटनास्थळी पोहचून वाहतूक सुरळीत केली.
घटनास्थळी फोटो काढणाऱ्या मोबाइलधारकांची गर्दी

अपघातझाल्यानंतर क्रेन येईपर्यंत मिनीट्रक हटवता आला नाही. जवळपास एक ते दीड तासात नागरिकांची मोठी गर्दी या ठिकाणी झाली. दरम्यान बघ्यांपैकी अनेकांनी आपआपला मोबाईल काढून त्यामध्ये अपघाताचा फोटो काढण्यासाठी ट्रकजवळ गर्दी करत होते. अखेर पेालिसांनी अशा हवश्या नवश्यांना मागे सारले. मात्र अनेकांनी मदतीऐवजी फोटो काढण्यावरच जास्त भर दिला. इतकेच नाहीतर काहींनी रस्त्यावर पडलेली औषधीसुध्दा उचलून नेण्यास सुरूवात केल्याचे कळताच पोलिसांची कुमक वाढविण्यात आली.

औषधी घेऊन जाणारा मिनीट्रक रस्त्यावर उलटल्यानंतर क्रेनच्या मदतीने त्याला बाजूला करण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...