आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौण खनिजाची अवैध वाहतूक; चार ट्रकवर केली जप्तीची कारवाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरातूनहोणाऱ्या गौण खनिजाच्या अवैध वाहतुकीकडे महसूल प्रशासनाने लक्ष केंद्रित केले असून, मुरूम वाळूची वाहतूक करणाऱ्या चार ट्रकवर बुधवारी (दि. १०) जप्तीची कारवाई करण्यात आली. या चार वाहनधारकांकडून ७३ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
शहरात गौण खनिजाची वाहतूक करणारे (एम.एच. २९ एके ५८६७), (सी. जी. १२ सीओ १७३), (एम.एच. ३१-४१४२), (एम.एच. २७ एओ १६२७) आदी क्रमांकांचे ट्रक महसूल विभागाने ताब्यात घेतली. (एम.एच. २९ एके ५८६७) क्रमांकाच्या ट्रकमधून मुरमाची वाहतूक केली जात होती. अन्य तीन ट्रकमधून वाळूची वाहतूक केली जात होती. उपसा बंद असताना ट्रकमधून वाळूची वाहतूक होत असल्याने महसूल प्रशासनाच्या निदर्शनास आले. महापालिका क्षेत्रातील बडनेरा, कठोरा (नांदूरा), साईनगर अन्य एक ठिकाणी महापालिकेकडून कारवाई करण्यात आली. शहराच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात गौण खनिजाची चोरी होत आहे. बडनेरा ते कोंडेश्वर रोड, भानखेडा परिसर, महादेव खोरी, रहाटगाव, वरुडा आदीसह अनेक भागांत मोठ्या प्रमाणात गौण खनिजाची चोरी होत असल्याचे वारंवार समोर आले आहे. खुलेआम गौण खनिजाचे उत्खनन होत असताना महसूल विभागाकडून होणाऱ्या कारवाईचे प्रमाण मात्र फारच अल्प असल्याचे दिसून येत आहे. महादेवखोरीनंतर अमरावती तहसीलदार सुरेश बगळे यांच्याकडून करण्यात आलेली महिन्यातील दुसरी मोठी कारवाई आहे. तहसीलदार सुरेश बगळे यांच्या नेतृत्वात नायब तहसीलदार नीता लबडे, मंडळ अधिकारी व्ही. बी. धोटे, एस. के. कल्याणकर, तलाठी मनोज धर्माळे, राहुल वानखडे, सुनील उगले, ए.बी. आंबेकर, एस. एम. काकपूरे, भूषण डहाके, ए. एम. पाटेकर, एस. आर. भगत यांच्याकडून करण्यात आली.
वाहन दंड
एम.एच.२९ एके ५८६७ ६,२००
सी. जी. १२ सीओ १७३ २४,४००
एम.एच. ३१-४१४२ २४,४़००
एम.एच. २७ एओ १६२७ १८,३००