आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Missile Project Go Fast, Project Will Set Up In Nandagaon MIDC

मिसाइल प्रकल्पाला वेग, नांदगावपेठच्या पंचतारांकीत एमआयडीसीमध्ये होणार प्रकल्प

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - भारतीय संरक्षण मंत्रालयाचा नांदगावपेठ पंचतारांकित एमआयडीसीमध्ये प्रस्तावित मिसाइल प्रकल्प सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. याबाबत खासदार आनंदराव अडसूळ यांनी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांना पत्र िदले आहे. शिवाय अमरावती दौऱ्यादरम्यान केंद्रीय रस्ते,परिवहन जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनीदेखील मिसाइल प्रकल्पाबाबत विशेष लक्ष देणार असल्याचे स्पष्ट केले होते.

जिल्ह्यातील नांदगावपेठ औद्योगिक वसाहतीत राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या (एनटीसी) चार सह आठ टेक्सटाइल प्रकल्प सुरू होणार आहेत. एनटीसीचे प्रकल्प लवकर सुरू होण्याच्या दृष्टीने शासनाकडून विशेष लक्ष दिले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय उर्वरितपान. १०
मंत्रीनितीन गडकरी यांनी त्यांच्या अमरावती दौऱ्यात टेक्सटाइल हब निर्माण करण्याबाबत सूतोवाच केले होते. तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते ११ डिसेंबर २०११ भारत डायनॅमिक लिमिटेड (बीडीएल) या संरक्षण मंत्रालयाच्या मिसाइल प्रकल्पाचे भूमिपूजन केले होते. स्थानिकांना रोजगार मिळावा म्हणून नांदगाव पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रात मोठ्या कंपन्या सुरू होणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेता माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याकडून मिसाइल कंपनीचे भूमिपूजन केले. मिसाइल कंपनीसाठी जमीनदेखील आरक्षित केली. कंपनीसाठी आरक्षित जमिनीवर सुरक्षा भिंत बांधण्याचे कामदेखील सुरू झाले; मात्र साडेचार वर्षांचा कालावधी उलटल्यानंतरदेखील प्रकल्पाचे काम सुरू झाले नाही. तंत्रज्ञानाची मदत घेत आधुनिक उपकरण निर्माण करण्याची आवश्यकता आहे. एकीकडे दहशतवादी तर दुसरीकडे युद्धाचे ढग दाटत असताना याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. भारतीय सेनेकडे आधुनिक शस्त्रांची कमतरता असून, याकडेदेखील खासदार अडसूळ यांनी लक्ष वेधले. भारत डायनॅमिक लिमिटेड कंपनीचा नांदगावपेठ औद्योगिक प्रकल्प सुरू होण्याच्या दृष्टीने विशेष लक्ष देण्याची मागणी केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांना निवेदन देत केली.