आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘मिशन जागृती’ आयुक्तांचे ३० प्राचार्यांसोबत विचार‘मंथन’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- दहशतवाद,वाहतूक समस्या सायबर क्राइम रोखण्यासाठी कॉलेज युवकांना सोबत घेऊन ‘मिशन जागृती’ अभियान सुरू करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त डॉ. सुरेश मेकला यांनी शहरातील ३० कॉलेजेसच्या प्राचार्यांसोबत विचारमंथन केले.
कॉलेज तरुणांकडून या अभियानास जोरदार प्रतिसाद मिळत आहे. महाविद्यालयांच्या प्राचार्यांच्या भूमिकाही यामध्ये महत्त्वपूर्ण आहे. प्राचार्यांच्या या मिशनबाबत असणा-या कल्पना, अडचणी जाणून घेऊन मोहिमेला अधिक बळकटी देण्यासाठी पोलिस आयुक्तांनी शुक्रवारी चर्चा केली. कॉलेज परिसरातील वाहतूक समस्यांसोबत इतर प्रश्नांबाबतही प्राचार्यांनी या वेळी आयुक्तांना अवगत केले.
डॉ. मेकला यांनी समस्यांचे त्वरित निराकरण करण्यासाठी पावले उचलण्यात येणार असल्याचे सांगितले. ‘मिशन जागृती’मध्ये हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे. याचवेळी विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या पालकांनाही या मोहिमेत सहभागी होणे गरजेचे असल्याचे मत काही प्राचार्यांनी या वेळी व्यक्त केले. यांसारख्या मोहिमेत नागरिकांचा सहभाग वाढवण्यात आल्यामुळे प्रशासनाच्या योजना यशस्वी होण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत असते. कारण, जनसहभागाशिवाय कोणतीच योजना किंवा मोहीम यशस्वी होत नसल्याचे अनेक उदाहरणांमधून आतापर्यंत स्पष्ट झाले आहे. कॉलेजियन्स त्यांच्या समस्या, प्रश्न अडचणींना साद घालणाऱ्या या मोहिमेत जनसहभागाचे हे उदाहरण आदर्श आहे. त्यामुळेच पालकांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. दरम्यान, पोलिस ठाण्यांमध्ये नेमण्यात आलेल्या ‘मिशन जागृती’च्या समन्वयक अधिकाऱ्यांचा पोलिस आयुक्तांनी सत्कार केला. या मोहिमेसंबंधीचा कार्यक्रम नुकताच संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात पार पडला होता. या वेळी मनोगत व्यक्त करणाऱ्या पाच विद्यार्थ्यांना आयुक्तांनी प्रमाणपत्र देऊन गौरव केला.