आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुस-या दिवशीही कायम दगडफेकीची ‘दहशत’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- फेसबुकवर आक्षेपार्ह छायाचित्र टाकल्याच्या तत्कालिक कारणावरून बुधवारी शहरात दस्तूरनगर, यशोदानगर परिसरातील दुकानांवर युवकांनी अंधाधूंद दगडफेक करत दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला होता. व्यावसायिक, नागरिकांना वेठिस धरण्याच्या या हल्लेखोर प्रवृत्तीच्या निषेधार्थ दस्तूरनगर भागातील बहुतांश व्यावसायिकांनी गुरूवारी स्वयंस्फूर्तीने प्रतिष्ठानं बंद ठेवली. तत्पूर्वी, पोलिसांनी या दगडफेक प्रकरणी दोघांना अटक केली आहे.
बुधवारी दमदाटी करत दहशत पसरवत व्यावसायिकांना दुकान बंद पाडण्यास भाग पाडले होते. दुकानांच्या काचा फुटल्या, एटीएम तोडण्यात आले, दुकानांमध्ये दगडं आले, त्यामुळे व्यावसायिक चांगलेच घाबरले होते. दगडफेकीत चौघे किरकोळ जखमी झाले. दस्तूरनगर चौकापासून हातात काठ्या घेऊन निघालेले हे युवक यशोदागनर भागात पोहचले. दस्तूरनगर चौकात त्यांनी मोठ्या प्रमाणात हैदोस घातला. त्यामुळे, व्यापाऱ्यांनी गुरूवारी प्रतिष्ठाण बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर, गुरूवारी शहरात तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. गुरूवारीही यशोदानगर भागात आठ ते दहा जणांनी जमाव करण्याचा प्रयत्न केला. यावेळी, पोलिसांनी आठ जणांना अटक केली. तत्पूर्वी, बुधवारी रात्री पोिलसांनी दोघांना अटक केली आहे. गुरूवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना दहा नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सीसीटीव्ही फुटेज तपासणार
बुधवारीहल्लेखोरांनी केलेल्या दगडफेकीत दुकानं एका एटीएम केंद्राची तोडफोड झाली. एटीएम काही दुकानांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लागलेले होते. सीसीटीव्ही फुटेजची पोलिस तपास करणार आहे. यामुळे दगडफेक करणाऱ्यांची ओळख स्पष्ट होईल, असे फ्रेजरपुराचे ठाणेदार रियाजोद्दीन देशमुख यांनी सांगितले.
व्यापा-यांचे झाले प्रचंड आर्थिक नुकसान
बुधवारच्यादगडफेकीमुळे या परिसरातील अनेक व्यापा-याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. क्रॉकरी साहित्याचे नुकसान झाले. दुकानांच्या काचा फोडल्या. गुरूवारी याबाबात परिसरातील संबंधीत व्यापाऱ्यांसोबत चर्चा केली असता त्यांनी हल्लेखोराविरुद्ध रोष व्यक्त केला आहे.
चौकाचौकांत पोलिस
दगडफेकीच्याघटनेमुळे पोलिसांनी बुधवारी सायंकाळपासून शहरात चोख बंदोबस्त लावला आहे. दहा स्ट्रायकिंग फोर्स, यशोदानगर, दस्तूरनगर भागात चार फिक्स पॉईन्ट, याव्यतिरीक्त जागोजागी पोलिसांचा ताफा तैनात आहे. सतत गस्त घालण्यात येत आहे, एक्स्प्रेस हायवेवर गस्त, दोन आरसीपी प्लॅटून बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आल्या आहेत.