आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यालयात अाेतणार शेणखत , प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी घातला कृषी अधीक्षकांना घेराव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - युरियाचीफूलभरणी करण्यासाठी मुबलक साठा नसल्याने संतप्त झालेले प्रहारचे आमदार बच्चू उपाख्य अाेमप्रकाश कडू यांनी शुक्रवारी कृषी अधीक्षक दत्तात्रय मुळे यांना घेराव घातला. जिल्ह्यासाठी ११ हजार मेट्रिक टन युरियाची गरज असताना शासनाने केवळ अकराशे मेट्रिक टन युरिया देऊन शेतकऱ्यांची थट्टा केल्याचा आरोप कडू यांनी या वेळी केला. दाेन सप्टेंबरपर्यंत शासनाने मुबलक पुरवठा केल्यास कार्यालयात शेणखत भरून आंदोलन करण्याचा इशाराच अामदार कडू यांनी अधीक्षकांना दिला. कुठलीची पूर्वसूचना नसताना अामदार कडू कार्यालयात धडकत अधीक्षकांना घेराव घातल्याने त्यांची चांगलीच भंबेरी उडाली.
यंदा पाणी उशिरा आल्यामुळे बळीराजाच्या पेरण्या उशिरा झाल्या. त्यामुळे फूलभरणी करण्यासाठी जुलैमध्ये केवळ चार हजार मेट्रिक टन, तर ऑगस्ट महिन्यात ११०० मेट्रिक टन युरिया पाठवून शासनाने शेतकऱ्यांची थट्टा केल्याचा अाराेप प्रहारने केला अाहे. शुक्रवारी आंदोलनात छोटू महाराज वसू, रूपेश पुंड, प्रदीप बंड, दीपक भोंगाडे, धीरज जयस्वाल कार्यकते उपस्थित होते.

नेहमीचीच समस्या
दरवर्षीचयुरियाचे नियोजन करण्यात येते; परंतु नेहमीच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या समस्येला सामोरे जावे लागते. दरवर्षीचेच नियोजन असूनदेखील शासनाकडून यावर पाहिजे ते नियोजन करण्यात येत नसल्याचे कडू यांनी सांगितले. जुलै ऑगस्ट या दोन महिन्यांसाठी किमान १५ हजार मेट्रिक टन युरियाची गरज असते, प्रत्यक्षात मात्र तेवढे कुठल्याच वर्षी येत नसल्याचे कडू म्हणाले. दरवर्षी युरियासाठी आंदोलन करायचे का; शासनाला त्यांची जबाबदारी कळत नाही का, असे खडे बोलही अामदार कडू यांनी अधीक्षकांना सुनावले.

रात्री येणार २२०० मेट्रिक टन युरिया
जोपर्यंतयुरियाचा मुबलक साठा येत नाही, तोपर्यंत येथून उठणार नाही, असा पवित्रा अामदार कडू यांनी घेतला. त्यामुळे कृषी अधीक्षक मुळे यांनी अशोक ठाकूर दिलीप काळे यांच्याशी चर्चा केली. मात्र, चर्चेत काहीच निष्पन्न झाल्याने अखेर मुळे यांनी मुंबईला चर्चा केल्यानंतर रात्रीतूनच २२०० मेट्रिक टन खत पाठवणार असल्याची ग्वाही मिळाल्यावर अामदार कडू यांनी कार्यालय सोडले. उर्वरित साठा दाेन सप्टेंबरपर्यंत मिळाला नाही, तर कार्यालय शेणखताने भरू, असा इशारा कडू यांंनी अधिकाऱ्यांना दिला.