आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MLA Dr. Bonde Demand To Collector , Divya Marathi

बसमालक, आरटीओवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा - आमदार डॉ. बोंडेची मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - अमरावती-नागपूर महामार्गावर तळेगावजवळ खासगी बसला आग लागून पाच जणांचा होरपळून मृत्यू झाल्याप्रकरणी संबंधित बसमालक व आरटीओ यांना जबाबदार धरून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी केली आहे.

आमदार बोंडे यांनी शुक्रवारी सकाळी जिल्हाधिकार्‍यांच्या दालनात सुमारे दीड तास ठिय्या दिला. अपघातातील सर्व जखमींचा शासकीय खर्चाने उपचार करण्यात यावा, मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दहा लाख, तर जखमींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख देण्यात यावेत, खासगी बसेसमध्ये सुरक्षाविषयक यंत्रसामग्री उपलब्ध असावी आदी प्रमुख मागण्या त्यांनी केल्या.

आगीच्या घटनेतील जखमींवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. आमदार डॉ. बोंडे यांनी याबाबतची विस्तृत माहिती जिल्हाधिकार्‍यांसमक्ष सादर केली. मागण्यांची पूर्तता होईस्तोवर दालन सोडणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. या वेळी निळकंठ मुरूमकर, अनिल मिर्शा, रमेश देशमुख, आप्पासाहेब गेडाम, अजय आगरकर, अशोक ठाकरे, हरिविजय गेडाम, दिनेश शर्मा, विलास आघाडे, अनिकेत राऊत, नितीन मोहोड आदी कार्यकर्ते उपस्थित होते.