आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीचे सर्व गट आमच्या सोबतच- आमदार रवि राणा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती-जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व गट आणि घटक पक्ष आमच्यासोबत आहेत. नवनीत कौर राणा यांच्या जातवैधता प्रमाणपत्राबाबत जिल्ह्यातील काही पक्षांच्या जबाबदार नेत्यांनी हेतुपुरस्सर आडकाठी आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आमदार रवि राणा यांनी शनिवारी पत्रपरिषदेत केला.
गेल्या काही दिवसांपासून प्रसार माध्यमांपासून दूर राहिलेले आमदार राणा यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. पक्षर्शेष्ठींनी योग्य उमेदवाराची निवड केली आहे. राष्ट्रवादीचे सरचिटणीस संजय खोडके व माजी आमदार सुलभा खोडके आई-वडिलांसारखे आहेत. दिनेश बूब बंधूसमान, तर गुणवंत देवपारे चांगले मित्र आहेत. रिपाइंचे राजेंद्र गवई यांनीदेखील नवनीत राणांच्या उमेदवारीला सर्मथन दिले आहे. येत्या निवडणुकीत त्यांचे सहकार्य नक्कीच मिळेल. शिवसेनेच्या काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांचेही सर्मथन आहे. राष्ट्रवादीच्या सर्वच गटांचे सर्मथन असून, पक्षासाठी तसेच जिल्ह्याच्या विकासासाठी सगळेच जण मिळून काम करणार आहेत, असे आमदार रवि राणा म्हणाले. विद्यमान खासदारांनी मागील पाच वर्षांत केवळ टाइमपास केला. विकासकामांऐवजी इतर गोष्टींकडेच त्यांचा कल राहिल्याने शहरासह जिल्ह्यात विकासाचा खेळखंडोबा झाला, असा आरोप त्यांनी केला.