आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राष्‍ट्रवादी कॉंग्रेसच्‍या गळाला धक्कादायक मासे!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - आघाडीत बिघाडी झाल्यानंतर सुरू झालेल्या वेगवान राजकीय हालचालींमुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या गळाला धक्कादायक मासे लागले आहेत. एक सुरेखा ठाकरे गेल्याचे उट्टे काढत पक्षाने माजी मंत्री वसुधा देशमुख आमदार अॅड. यशोमती ठाकूर यांच्या भगिनी संयोगिता निंबाळकर यांना पक्षात सामावून घेत त्यांच्या उमेदवारीचा मार्गही मोकळा केल्याची माहिती आहे.

दरम्यान ,उशिरा सायंकाळपर्यंत जिल्ह्यातील पाच मतदारसंघांचा निर्णय झाला असून, उर्वरित तीन मतदारसंघांबाबतची चर्चा सुरू असल्याचे पक्ष सूत्रांचे म्हणणे आहे. बडनेरामध्ये पक्षाने स्वतंत्र उमेदवार उभा करता मावळते आमदार युवा स्वाभिमानचे रवि राणा यांना पाठिंबा द्यायचे ठरवले आहे.
दुसरीकडे अचलपूर मतदारसंघातून माजी मंत्री वसुधा देशमुख यांनी राकाँची उमेदवारी स्वीकारली असून, मेळघाटात भाजपचे माजी आमदार राजकुमार पटेल यांनी हाताला घड्याळ बांधले आहे, तर मोर्शीत माजी कृषिमंत्री हर्षवर्धन देशमुख हे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत.

तिवस्यातून संयोगिता निंबाळकर?
तिवसामतदारसंघातून प्रदेश उपाध्यक्ष प्रा. शरद तसरे यांनी त्यांचे सुपुत्र भारत तसरे यांच्यासाठी उमेदवारी माग्‍ितली होती. परंतु गेल्या दोन दिवसांत झालेल्या घडामोडींमुळे त्यांचा दावा क्षीण झाला असून आमदार अॅड. यशोमती ठाकूर यांच्या भगिनी संयोगिता निंबाळकर यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे.

दिग्‍गजांची आज उमेदवारी
राजकीय उलथापालथीमुळे अनेक दिग्‍गजांचे आजचे बेत टळले. त्यामुळे त्या सर्वांना उद्याच्या (शनिवार) शेवटच्या दिवसाचा धार घ्यावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर अमरावतीचे आमदार रावसाहेब शेखावत (काँग्रेस) माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख (भाजप) अमरावतीतून, बडनेराचे आमदार ररि राणा (अपक्ष) माजी आमदार सुलभा खोडके (काँग्रेस) बडनेरातून तर माजी मंत्री वसुधा देशमुख (राकाँ) अचलपुरातून उमेदवारी दाखल करणार आहे.