आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पेढीग्रस्तांना वाढीव मोबदला; बैठकीत घेण्यात आले महत्त्वपूर्ण निर्णय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- पेढीधरणग्रस्तांसंबंधी शुक्रवारच्या बैठकीत दोन महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यानुसार, जमिनीचा वाढीव मोबदला प्रौढ सदस्यांच्या प्रमाणात कुटुंबांची संख्या ग्राह्य धरून त्यांना इतर सोयी पुरवल्या जाणार आहेत. आमदार रवि राणा यांच्या पुढाकाराने पेढी धरणग्रस्तांची एक बैठक शुक्रवारी दुपारी जिल्हाधिका-यांच्या दालनात घेण्यात आली. या वेळी हे दोन्ही प्रस्ताव पारित करून शासनाला पाठवण्याचा निर्णय जिल्हाधिका-यांनी घोषित केला. प्रकल्पग्रस्तांची बाजू मांडताना प्रा. साहेबराव विधळे, तर त्याचा खुलासा करताना उपजिल्हाधिकारी राम सिद्धभट्टी यांनी हा मुद्दा लक्षात आणून दिला.

विधळे म्हणाले, केंद्र शासनाच्या नव्या कायद्यानुसार शेतकऱ्यांच्या जमिनींना चौपट भाव मिळणार आहे; परंतु प्रत्यक्षात तसे होत नाही. बुडित क्षेत्रातील जी जमीन अमरावतीपासून (जिल्ह्याचे ठिकाण) ५० किलोमीटरपेक्षा जास्त लांब आहे, अशाच जमीनधारकांना त्याचा लाभ मिळणार आहे. सध्या देशभर सुरू असलेल्या प्रकल्पांमध्ये असा एकही प्रकल्प नाही, त्याला हे सूत्र लागू पडते.
कोणाला लाभच मिळू नये, अशा पद्धतीने हा कायदा तयार करण्यात आला आहे. याशिवाय, १८ वर्षांवरील सदस्य म्हणजे स्वतंत्र कुटुंब अशी शासनाची व्याख्या आहे. परंतु, पेढी धरणग्रस्तांची मोजणी करताना तसे झाले नाही. त्यामुळे प्रतिकुटुंब कमी जागा संबंधितांच्या वाट्याला आली आहे, अशी मांडणी त्यांनी या वेळी केली. प्रकल्पग्रस्तांची बाजू शासनासमोर योग्य रितीने मांडण्यात आल्यामुळे सकारात्मक संदेश आजच्या चर्चेतन प्राप्त झाला आहे. या दोन्ही बाबी ऐकून घेतल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी त्याबाबतची अधिक सुस्पष्ट मांडणी केली. ते म्हणाले, हे दोन्ही मुद्दे जनहिताचे आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीचा ठराव म्हणून तो शासनाकडे पाठवले जाईल. बैठकीला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे, काँग्रेसचे विलास इंगोले, शेतकरी नेते रामदास पाटील, अळणगावकर आदी उपस्थित होते.
प्रथमच विस्तारित समितीचे झाले गठन
जिल्हाधिकारीकिरण गित्ते रुजू झाल्यानंतर प्रथमत:च गावकऱ्यांचा समावेश असलेली विस्तारित समिती गठित करण्यात आली. त्या समितीची आजची ही पहिलीच बैठक होती. त्यामुळे पेढी धरण क्षेत्रातील प्रत्येक गावाचा प्रतिनिधी आजच्या बैठकीला उपस्थित होता. जिल्‍हाधिकारी दालनात शुक्रवारी दुपारी पेढी धरणग्रस्तांची बैठक घेण्यात आली. या वेळी उपस्थित प्रशासन, पदाधिकारी धरणग्रस्त.