आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कि'राणा' पकडला! आमदार राणांसह तिघांविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- मतदारांना किराण्याचे प्रलोभन दाखवून त्याचे वाटप केल्यामुळे आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी आमदार रवि राणा यांच्यासह ज्या व्यक्तींचा किराणा वाटपात सहभाग आढळला, त्यांच्याविरुद्ध बुधवारी (दि. २४) राजापेठ, खोलापुरी गेट, फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, पोलिसांनी मोठ्या प्रमाणात वाटपासाठी आलेला किराणा जप्त केला. मतदारांना आमिष दाखवण्याच्या या घटनेमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. बडनेरा मतदारसंघाच्या परिसरात मंगळवारपासून कार्डद्वारे नागरिकांना किराणा वाटप सुरू असल्याची कि'राणा'पकडला!

माहिती पोलिसांना मिळाली होती. बुधवारी शहरातील फ्रेजरपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या साधनानगर जयंत कॉलनी परिसरात सकाळपासून किराणा वाटप सुरू असल्याचा सुगावा पोलिसांना लागला. त्यामुळे पोलिस पथक आचारसंहितेचे पालन काटेकोर होण्यासाठी नेमण्यात आलेल्या ह्यफ्लाइंग स्कॉडने परिसरात जाऊन पाहणी केली. या वेळी साधना कॉलनी येथील वासुदेव किशनचंद खत्री यांच्या घरात मोठ्या प्रमाणात तेल, साखर, चणा डाळ, डालडा, मुरमुरे आदी साहित्य आढळून आले. पोलिसांनी चौकशी केली असता, खत्री यांनी सांगितले, की वडिलांच्या वर्षश्राद्धासाठी आपण दरवर्षी किराण्याचे वाटप करीत असून, यावर्षीसुद्धा वाटप करण्यात येत आहे. खत्री यांनी किराणा खरेदीची बिलेसुद्धा पोलिस फ्लाइंग स्कॉडच्या पथकाला दाखवले आहे. मात्र, याचवेळी तीन महिला या ठिकाणाहून किराणा घेऊन जाताना पथकाला दिसून आल्या. अधिक चौकशी केली असता, या महिलांकडे एक कार्ड आढळून आले. कार्ड घेऊन संबंधित ठिकाणी गेल्यास कार्ड पंच करून किराणा मिळत असल्याची बाब पोिलसांच्या लक्षात आली. किराणा वाटप झालेल्या व्यक्तींचे नाव मोबाइल क्रमांकांची नोंद वाटपस्थळी करण्यात येत होती. त्यामुळे नोंदी रजिस्टर पोलिसांनी जप्त केले. मंगळवारी खोलापुरी गेट ठाण्याच्या हद्दीत हनुमाननगरमध्ये, राजापेठच्या हद्दीत साईनगर भागातील काही भाग बुधवारी फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात ही कारवाई झाली आहे. राजापेठमध्ये एक लाख ४९ हजार, खोलापुरी गेटमध्ये एक लाख १० हजार आणि एक लाख ११ हजारांचा किराणा जप्त केला. मात्र, याचवेळी निवडणूक फ्लाइंग स्कॉडने सुपूर्दनाम्यावर हा किराणा ज्यांच्या घरात मिळाला, त्यांना परत केला आहे. दरम्यान, कार्यकारी दंडाधिकारी देविदास कोल्हे यांच्या तक्रारीवरून खोलापुरी गेट पोलिस ठाण्यात आमदार रवि राणा, सुनील धांडे लता श्याम खरबडे यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
"पंच'कार्डवर असलेला मजकूर
"पंच'कार्डवरदसरा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, रवा- किलो, तेल- किलो, चणा डाळ- किलो, साखर- किलो, डालडा- किलो आणि मुरमुरे- किलो िलहिले आहे. त्याखालील भागात दीपावलीची रवि किरणे आपल्या घरात नित्य नवा आनंद घेऊन येवो, शुभेच्छुक तसेच वैध कालावधी मंगळवार २३ सप्टेंबर ते गुरुवार दि. ऑक्टोबर २०१४. वेळ- सकाळी ११ ते सायंकाळी असे लिहिलेले आहे. कार्डच्या मागील बाजूवर वर्ष २०१८, सदर कार्ड २०१४ ते २०१८ पर्यंत वैद्य राहील. वर्ष २०१७, कृपया हे कार्ड जपून ठेवा, भविष्यातील योजनांसाठी उपयोगी पडेल. वर्ष २०१६, सदर कार्ड हे संबंधित योजनेसाठीच उपयुक्त आहे. वर्ष २०१५, ही दिवाळी आपल्या जीवनात आनंद गोडवा घेऊन येवो, वर्ष २०१४, सदर योजना कायमस्वरूपी फक्त महिलांसाठीच आहे. एक कार्ड संपूर्ण परिवारासाठी वैध राहील, असे लिहिले आहे. तसेच हा किराणा नागरिकांना ज्या पॉलिथीनमध्ये दिला जात होता, त्या पॉलिथीनवर दसरा, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तसेच या पावन पर्वावर उगवणारा "रवि' (मोठ्या आकारात) आपल्या जीवनात सुख-शांती, समृद्धीची किरणे घेऊन येवो, हीच मंगलप्रार्थना असे लिहिले आहे.
विरोधकांची चाल
निवडणुकीच्यातोंडावर स्वत:च किराणा वाटायचा आणि माझे नाव पुढे करायचे, ही विरोधकांची चाल आहे. मी नेहमीच गरिबांना मदत करतो; मात्र या वेळी आचारसंहितेमुळे काही करू शकलो नाही. आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल झाला, हे योग्य नाही. याचवेळी जे दारू, पैसा वाटतात, त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल होत नाहीत. विरोधकांच्या दबावामुळेच गुन्हे दाखल झाले आहेत. याचे उत्तर देणार आहे. रविराणा, आमदार