आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्काबुक्की केली असल्यास पाच वर्षांसाठी निलंबित करा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - राज्यपालांना धक्काबुक्की केल्याचा एकनाथ खडसे यांनी केलेला आरोप धादांत खोटा आहे. खरोखरींच राज्यपालांना धक्काबुक्की झाली असेल तर विधानसभेत त्याची व्हिडिओ क्लिप त्यांनी दाखवावी. त्यामधून खडसे यांचे आरोप सिद्ध झाल्यास पाच वर्षासाठी निलंबित करा, असे परखड मत काँग्रेसचे आमदार वीरेंद्र जगताप यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत व्यक्त केले.

‘भाजपचे सरकार हे अल्पमतात आहे. पक्षाने विधानसभेत बहुमत सिद्ध केलेलं नाही. त्यामुळे, राज्यपाल विद्यासागर राव यांनी अभिभाषणाला येऊ नये. ते आल्यास त्यांच्याविरोधात निदर्शने करण्यात येतील’, असे अगोदरच स्पष्ट करण्यात आले होते. तरीही, राज्यापाल अभिभाषणासाठी आले. त्यावेळी, काँग्रेसचे सर्वच आमदार पायऱ्यांवर बसून घोषणाबाजी करत होते. निलंबित करण्यात आलेले आमदार त्यावेळी १५ फुटांवर होते. त्यामुळे, धक्काबुक्की दर दूरच राज्यपाल बऱ्याच लांब असल्याने त्यांना बघता सुद्धा आले नाही, असे जगताप यांनी गुरूवारी पत्रपरिषदेत स्पष्ट केले.