आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mla Yashomati Thakur Facebook Hak Issue At Amravati

तिवसाच्या आमदार यशोमती ठाकूर यांचे ‘फेसबुक’ पुन्हा हॅक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - तिवसाच्या आमदार यशोमती ठाकूर यांचे दुसरे फेसबुक अकाउंटही हॅक झाले आहे. यापूर्वीही आमदार ठाकूर यांचे एफबी अकाउंट हॅक झाले होते. त्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यावेळीही त्यांनी त्यांच्या अकाउंटचा कुणीतरी वापर करीत असल्याचे तक्रारीत नमूद केले होते.

त्यानंतर, त्यांनी पुन्हा नव्याने फेसबुक अकाउंट तयार केले. काही दिवस हे खाते सुरळीत चालल्यानंतर हे अकाउंटही हॅक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे, आमदार ठाकूर यांनी याबाबत पुन्हा पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

या प्रकरणाचा तपास सायबर सेलकडे सोपण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी दिली आहे. दरम्यान, सलग दुसऱ्यांदा आमदार ठाकूर यांचे फेसबुक अकाऊंट हॅक झाल्यावर ठाकूर यांच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली असून, दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.