अमरावती - तिवसामतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांचे
फेसबुक अकाउंट अज्ञात व्यक्तीने 'हॅक' केले आहे. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी रविवारी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
फेसबुक अकाउंट 'हॅक' झाल्याचे आमदार ठाकूर यांच्या रविवारी सकाळी लक्षात आले. यासोबतच मेल अकाउंटसुद्धा हॅक झाल्याची त्यांना शंका आहे. आमदार ठाकूर यांनी गाडगेनगर पोलिस ठाणे गाठून याप्रकरणी तक्रार िदली असून, पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा नोंदवला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका आमदाराचे अकाउंट हॅक होण्याचा प्रकार गंभीर आहे. त्यामुळे तक्रार दाखल करून सायबर क्राइमकडे तपास सोपवण्यात आला आहे. अकाउंट हॅक करणारा कोण? यामागे राजकीय षड््यंत्र तर नाही ना, असे प्रश्न यामुळे निर्माण झाले आहेत.
अकाउंट हॅक झाल्याची तक्रार
आमदार अॅड. यशोमती ठाकूर यांनी फेसबुक अकाउंट हॅक झाल्याची तक्रार दिली आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. कैलासपुंडकर, ठाणेदार,गाडगेनगर.