आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mla Yashomati Thakur Visit Collector Officefor Rehabilitation Issue Amaravati

पुनर्वसनाच्या मुद्दय़ावर आमदार यशोमती ठाकूर आक्रमक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - पेढी धरणामुळे विस्थापित झालेल्या रोहणखेड, पर्वतापूर तसेच दोनद या गावांतील नागरिकांच्या पुनर्वसनासंदर्भात प्रशासकीय स्तरावर कोणत्याही विशेष हालचाली करण्यात येत नसल्याने संतप्त झालेल्या आमदार अँड. यशोमती ठाकूर यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली. यावेळी झालेल्या बैठकीत कोणताही ठोस तोडगा समोर आला नाही. परिणामी आता तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला.

आमदार ठाकूर यांनी शासनस्तवार हा विषय लावून धरला आहे. परंतु, स्थानिक स्तरावर त्याबाबत ठोस हालचाली होत नसल्याने आज या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. जिल्हाधिकारी राहुल महिवाल, अप्पर जिल्हाधिकारी किशोर कामुने यांच्याशी यशोमती ठाकूर यांनी चर्चा केली. पुनर्वसनाच्या मुद्दय़ासोबतच वलगाव, केकतपूर, माहुली जहागीर येथील निराधार नागरिकांना जागा उपलब्ध करून देण्याची मागणी या वेळी करण्यात आली. नांदगावपेठच्या पंचतारांकित एमआयडीसीमध्ये शेतकर्‍यांच्या जमिनी अधिग्रहित करताना जे लोक न्यायालयात गेले, त्यांना एकरी दोन लाख 28 हजार रुपये या हिशेबाने मोबदला मिळाला. ज्यांची आर्थिक स्थिती चांगली नव्हती, ते न्यायालय गाठू शकले नाहीत; अशा 400 शेतकर्‍यांनादेखील योग्य मोबदला देण्यात यावा, अशी मागणी यशोमती ठाकूर यांनी केली. शासनस्तरावर सुरू असलेल्या पाठपुरवठय़ासंदर्भात चर्चा या वेळी झाली. पुनर्वसन अधिकारी प्रमोद देशमुख, उपविभागीय अधिकारी मोहन पातूरकर, तहसीलदार अनिल भटकर, एमआयडीसीचे अधिकारी आदी उपस्थित होते.