आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mns Activist Visit At Holikrosa School, Divya Marathi

होलिक्रॉस शाळेत ‘मनसे’ची धडक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- होली क्रॉस शाळेत प्रवेश प्रक्रियेदरम्यान पालकांना योग्य वागणूक मिळत नाही, समाधानकारक माहिती दिली जात नाही, असा आरोप करत ‘मनसे’ कार्यकर्त्यांनी बुधवारी (दि. 28) जिल्हा उपाध्यक्ष राहुल कडू यांच्या नेतृत्वात शाळेवर धडक दिली. या वेळी कार्यकर्त्यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. श्रीराम पानझडे यांना शाळेत बोलावून त्यांच्यापुढे पालकांच्या समस्या मांडल्या.

होली क्रॉसमध्ये पाल्याला प्रवेश मिळावा म्हणून पालकांची गर्दी राहते. अशावेळी शाळा प्रशासनाकडून पालकांना योग्य ती वागणूक मिळत नाही. नोटीस बोर्ड शाळेच्या आतमध्ये आहे, शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप राहते, अशावेळी पालकांना नोटीस बोर्डवरचा मजकूर वाचता येत नाही. असे असतानाही शाळा प्रशासन मुख्य प्रवेशद्वार बंद ठेवते. त्यामुळे प्रवेशासंबंधीची माहिती घेण्यासाठी येणार्‍या पालकांना व पाल्यांना उन्हात ताटकळत उभे राहावे लागते असा आरोप राहुल कडू यांनी केला. प्राथमिक शिक्षणाधिकार्‍यांनीसुद्धा जवळपास दहा मिनिटे उन्हाचे चटके सहन केले. शिक्षणाधिकार्‍यांनी होली क्रॉसच्या मुख्याध्यापिकांशी चर्चा केली. पालकांशी योग्य वागणूक देण्याबाबत मौखिक आदेशही दिले. या वेळी अजय शेळके, अमोल कथे, प्रितेश अवघड, अनिल गायकवाड, भूषण नागे, पंकज पर्वतकर आदी मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.