आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मर्जीतील आयुक्त आणून निवडणूक लढवण्याचा बेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - 2014 च्या विधानसभा निवडणुकीत आमदार रावसाहेब स्वकर्तृत्वावर निवडून येऊ शकत नाहीत. ही बाब रावसाहेब आणि त्यांच्या सर्मथकांना ठावूक आहे. म्हणूनच मर्जीतील पोलिस आयुक्तांना आणायचे आणि निवडणूक जिंकायची, असा बेत रावसाहेबांनी आखला आहे. यातूनच काहीही दोष नसताना पोलिस आयुक्त अजित पाटील यांच्या बदलीची मागणी काँग्रेसकडून होत आहे, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा संघटक पप्पू पाटील यांनी गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.

राजकमल चौकातील दहीहंडी स्पर्धेच्या बक्षीस वितरणाच्या सोहळ्यात आमदार शेखावत यांना गजेंद्र उमरकरने थप्पड लगावली. यावेळी मंचावर पेालिस आयुक्त पाटील हजर होते. रावसाहेबांना झालेल्या मारहाणीचा आम्ही निषेध केला आहे. मात्र, त्यासाठी काँग्रेसने शहर बंद करण्याचा प्रय} करावा, हा राजकीय पोळी शेकण्याचाच प्रकार आहे. तत्कालीन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी निवडणूक काळात रावसाहेबांना मदत केली. त्यामुळेच ते निवडणूक जिंकले, असा आरोपही पप्पू पाटील यांनी केला.

पोलिस आयुक्त पाटील यांना जेमतेम एक वर्ष झाले आहे. त्यांच्यावर थप्पड प्रकरणाचा ठपका ठेवून बदली करण्यासाठी आमदार शेखावत प्रय} करीत आहेत. हा प्रकार राजकीय षड्यंत्रच आहे. आमदार रवी राणा आणि आमदार रावसाहेब शेखावत यांच्यावरील आरोपांचे प्रकरण पोलिसांकडे चौकशीत असल्याने एरवी एकमेकांच्या विरोधात बोलणार्‍या या आमदारांनी आयुक्तांच्या बदलीची एकमुखी मागणी केली. एका उच्चपदस्थ अधिकार्‍याची विनाकारण बदनामी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहन करणार नसल्याचे पाटील म्हणाले. ठाणेदार धोत्रे व निलंबित कर्मचार्‍यावर अन्याय झाल्याचेही पाटील यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला मनसेचे पदाधिकारी ज्ञानेश्वर धाने, संतोष बद्रे, प्रवीण तायडे हजर होते.

थप्पड प्रकरणापासून आमदार रावसाहेब शेखावत चांगलेच चर्चेत आहेत. याच चर्चेने जोर धरल्यामुळे राजकीय कलगीतुरा रंगत आहे. विरोधकांकडून होत असलेल्या टीकाटिपणीला रावसाहेबांना सामोरे जावे लागत आहे.