आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mns Support Vidharbh Farmer For Drought Condition

मनसेचा महागावात एल्गार मोर्चा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महागाव - तालुक्यातील शेतक-यांची अवस्था दयनीय झाली आहे. दुबार, तिबार पेरणीची वेळ शेतक-यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे शासनाने शेतक-यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकरी वर्गांकडून होत असताना प्रशासन दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे शेतक-यांना मदत करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शुक्रवार, 4 जुलै रोजी तहसील कार्यालयावर एल्गार मोर्चा काढण्यात आला. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले आहे.

निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. यंदा पावसाने मृग नक्षत्रात दिलेली हुलकावणी शेतक-यांना त्रासदायक ठरली. दुबार पेरणी केल्यानंतरही शेतक-यांची पिके करपून गेली असून, आता दाद मागावी, तरी कुठे असा प्रश्न शेतक-यांना पडला आहे.
आर्थिकदृष्ट्या खचलेल्या शेतक-यांकडे आता शासनानेच लक्ष देणे गरजेचे झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने ज्या शेतक-यांवर दुबार पेरणीची वेळ आली त्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, गारपीटग्रस्त शेतक-यांना सरसकट वीस हजार रुपये आर्थिक मदत द्यावी, गारपीटग्रस्त शेतक-यांचे सर्वेक्षण चुकीचे करणा-यांवर कायदेशीर कारवाई करा, अनेक वर्षांपासून निराधार अपंग, श्रावणबाळ, विधवा यांचे बंद असलेले प्रकरण त्वरित चालू करून त्यांना न्याय द्याव, यासह इतरही मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी जगदीश नरवाडे, योगेश वाजपेयी, सुनिल चव्हाण, संतोष जाधव, विशाल डहाळे, संजय नरवाडे, सचिन सगने, राजू राठोड यांच्यासह मोठ्या प्रमाणात शेतकरी एल्गार मोर्चात सहभागी झाले होते.

गारपीटग्रस्त गावातील शेतक-यांचे धनादेशासह याद्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत आल्या असेल, त्यांच्या सर्व याद्या आणि धनादेश 10 ऑगस्ट 2014 पूर्वी अदा करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. जेणे करून प्राप्त झालेल्या आर्थिक मदतीतून शेतकरी खरीप हंगामात बी-बियाणे, कीटकनाशके खरेदी करू शकतील.
कास्तकारांची नाव नोंदणी
- गेल्या काही वर्षांत कास्तकारांवर मोठ्या प्रमाणात अन्याय झाला आहे. अशा कास्तकारांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे नाव नोंदणी करावी, त्या अनुषंगाने शासनासोबत लढा देता येईल. आणि शेतक-यांच्या न्याय मागण्या शासनाकडून मंजूर करता येतील. यासाठीच आजचा हा एल्गार मोर्चा काढण्यात आला.’’ जगदीश नरवाडे, मनसे, महागाव. तहसिलदारांना निवेदन देताना मनसेचे पदाधिकारी.