आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक प्रचारात रंगत आणणार मोबाइल अॅप , नेत्यांसाठी सरसावले यंगिस्तान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - विधानसभानिवडणूक जवळ येऊ लागल्यानंतर राजकीय नेत्यांचा प्रचार करण्यासाठी अमरावतीमधील टेक्नोसॅव्ही तरुणाई पुढे सरसावली आहे. प्रत्यक्ष प्रचारासोबतच तरुणाईने फेसबुक, वॉट्स अॅप, हाइक या सोशल साइट्स आणि मॅसेंजर अॅपच्या माध्यमातून आपापल्या नेत्याबद्दलची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे सुरू केले आहे.
आमदार रावसाहेब शेखावत, माजी मंत्री सुनील देशमुख, आमदार अभिजित अडसूळ, आमदार यशोमती ठाकूर, आमदार वीरेंद्र जगताप यांच्यासह सर्वच आमदारांच्या नावाने फेसबुक पेज सुरू झाले आहेत. अडसूळ, आमदार रवि राणा फार पूर्वीपासूनच फेसबुकरवर सक्रिय आहेत; परंतु यांपैकी आमदार राणा यांनी मध्यंतरीच्या काळ सोशल साइटने संपर्कापेक्षा प्रत्यक्ष संपर्कावरच भर दिला. लोकसभा निवडणुकीत ज्या प्रमाणे टीम नमोने हायटेक प्रचार केला, अगदी त्याच प्रकाराचे थोड्याफार फरकाने स्थानिक तरुण अनुकरण करीत आहेत.
आमदार रावसाहेब शेखावत यांच्या नावाने खास वेबसाइट कार्यान्वित आहे. त्यावरूनही व्यापक प्रमाणावर मािहतीची देवाणघेवाण सुरू आहे. वाॅट्स अॅप आणि हाइक या दोन्ही मॅसेंजर अॅपवरही ग्रुप तयार करण्यात आले आहेत. खासदार आनंदराव अडसूळ यांच्या समर्थकांनी लोकसभा निवडणुकीच्या काळात अमरावती प्रेस नावाचा वॉट्स अॅप ग्रुप तयार केला. त्यात केवळ प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना अॅड करण्यावरच भर देण्यात आला. मात्र, विधानसभा निवडणूक जवळ येऊ लागली, तसे अनेक सदस्य या ग्रुपमध्ये अॅड हाेण्यास सुरुवात झाली आहे.
शहराचे आमदार रावसाहेब शेखावत यांच्या मतदारसंघात तरुणांची संख्या विशेषत: इंटरनेट, स्मार्ट फोन्स, टॅब, लॅपटॉप, असे आधुनिक तंत्रज्ञान वापरणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे कमी वेळात जास्तीत जास्त तरुणांपर्यंत पाेहोचता येते.
निवडणुकांमध्येप्रचाराचे नवनवीन फंडे नहेमीच चर्चेचा विषय ठरत असतात. लोकसभा निवडणुकीत भाजपने हायटेक प्रचारासोबतच सोशल साइ्टसवरून प्रचारावर भर दिला होता. राज्यात विधानसभा निवडणुकीतही त्याचेच अनुकरण होत आहे. या प्रचाराचे लोण आता अमरावतीतही पोहोचले आहे.
गुगल प्ले स्टोअरवरून राजकीय पक्षांचे मोबाइल अॅप्लिकेशन्सही अमरावतीकर तरुणाइच्या मोबाइलमध्ये पोहोचले आहेत. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी या तीन प्रमुख पक्षांच्या अॅप्सचे आतापर्यंत सर्वाधिक डाउनलोडिंग झाले आहे.
भाजपचेसर्वाधिक अॅप : गुगलप्ले स्टोरवर भारतीय जनता पक्षाचे सर्वाधिक अॅप्लिकेशन्स दिसतात. त्यातील एक अॅप देशपातळीवरील आहे. उर्वरित प्रदेशनिहाय आहेत. पक्ष संघटनेबद्दल यात विस्तृत माहिती नमूद आहे.
काँग्रेसअॅपवर त्रिमूर्ती : पक्षाध्यक्षसोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंह अशा त्रिमूर्तीच्या छायािचत्रांचा समावेश काँग्रेसच्या अॅपवर आहे. काँग्रेस काय करणार, हे या अॅपच्या माध्यमातून जनतेला सांगण्यात येत आहे. काँग्रेसचे तीन अॅप सध्या स्टोरवर आहेत.
राष्ट्रवादीहीनाही मागे : अॅपच्याबाबतीत राष्ट्रवादी काँग्रेसही मागे नाही. शरद पवार यांच्या नावानेदेखील जाणता राजा नावाचे अॅप स्टोअरवर आले आहे. राष्ट्रवादीच्या अॅपवरून पक्षाची, तर जाणता राजा अॅपच्या माध्यमातून पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे कार्य, निर्णय जनतेपर्यंत पोचवले जात आहेत.
मनसेमित्र : मोबाइलअॅप्लिकेशनच्या बाबतीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही मागे नाही. ‘मनसे मित्र’, या नावाने पक्षाचे अॅप गुगल प्ले स्टोरवर आले असून, अमरावतीकर तरुणाईच्या मोबाइलमध्येही दिसू लागले आहे. त्यातील मराठीचा सर्वाधिक वापर खास आकर्षणाचे केंद्र आहे.
सेनेचाहीभगवा : शिवसेनेचाभगवाही अॅप स्टोरवर फडकला आहे. सेनेचे सुमारे सात अॅप्लिकेशन्स स्टोरवर उपलब्ध आहेत. प्रबाेधनकार ठाकरे यांच्या विचारांवर आधारित अॅपही येथे उपलब्ध आहे.
सहज संपर्क शक्य
टीव्हीवरकिंवा वर्तमानपत्रात माहिती येईल केव्हा ती मतदारांपर्यंत पोहोचणार केव्हा, याची प्रतीक्षा करण्याची गरज नाही. फेसबुक, ट्विटर, वॉट्स अॅप, हाइक आणि अॅप आता केवळ मनोरंजनाचे साधन राहिलेले नाही, ते माहितीचे जलद आदानप्रदान करण्याची माध्यमं झाली आहेत. म्हणूनच सगळ्यांनाच ते महत्त्वाचे वाटत आहेत. सनीदेशमुख, सॉफ्टवेअरइंजिनिअर
कार्यकर्त्यांनाप्रेरणा
अशाअॅपच्या माध्यमातून पक्षातील घडामोडींची माहिती सामान्यातील सामान्य कार्यकर्त्यांपर्यंतही पोहचू शकते. हे अॅप उपयुक्त असेच आहेत. राहुलमाटोडे, युवासेनाकार्यकर्ता
सोनिया, राहुल गांधी, मनमोहन सिंह यांची छायाचित्र असलेले हे काँग्रेसचे अॅप. भाजपनेही याच माध्यमातून लाेकसभा निवडणुकांपासून सुरुवात केली अाहे.

अनेक मुद्द्यांवर चर्चा
अॅपच्यामाध्यमातून विविध राजकीय पक्ष अनेक मुद्द्यांवर चर्चा घडवून आणत आहेत. जसे मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण असावा ? आपल्या मतदारसंघात उमेदवार म्हणून मतदारांनाच नावे विचारली जात आहेत. पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे संपर्क, सभा, संमेलने यांची माहिती, क्षणाक्षणाला घडणाऱ्या राजकीय घडामोडींचे न्यूज अपडेट मतदारांपर्यंत पोचवण्यासाठी या अॅप्सचा राजकीय पक्ष अधिकाधिक वापर करीत आहेत.