आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्ध्या तासात केले नऊ जणांचे मोबाइल लंपास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- शुक्रवारी (दि. १९) सायंकाळी बाजारात आलेल्या नऊ व्यक्तींचे नऊ मोबाईल अवघ्या अर्ध्या तासात चोरट्यांनी लंपास केले.ही घटना फ्रेजरपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शुक्रवार आठवडी बाजारात घडली. एका व्यक्तीचा मोबाइल चोरताना नागरिकांनी संशयिताला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले . या बाजारात एकाचवेळी नऊ मोबाईल चोरीला जाण्याची ही पहिलीच वेळ असून, या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रभू कॉलनीतील उत्तम बन्सोड( ५६) हे बाजारात खरेदी करताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या खिशातील १६ हजारांचा मोबाईल चोरला. त्यानंतर अर्ध्या तासात किशोरनगरमध्ये राहणारे सुधीर गणवीर यांच्यासह अन्य सात जणांचे मोबाईल चोरीला गेल्याचे लक्षात आले.
बातम्या आणखी आहेत...