आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक कॉल करू शकतो तुमचे आयुष्य स्विच ऑफ, पेट्रोल भरताना मोबाइलचा वापर धोकादायक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- पेट्रोल आणि डिझेल हे अतिज्वलनशील पदार्थ असल्याने ते हाताळताना आवश्यक ती काळजी खबरदारी घ्यावी लागते. मात्र, नियमांकडे दुर्लक्ष करून पंपावर पेट्रोल भरताना उचललेला मोबाईलवरील एक काॅल तुमचे आयुष्य स्वीच आॅफ करण्यास कारणीभूत ठरू शकतो. पेट्रोल पंपावर मोबाईलवर बोलू नका, वाहन पूर्ण बंद करा, धुम्रपान करू नका, असे नियम आहेत.
मात्र, या नियमांचे िकती लोक पालन करतात,याबाबत िदव्य मराठी ने गुरुवारी (दि.२९)आढावा घेतला असता वाहनचालकांसह पंपावरील काही कर्मचारीही मोबाईलचा सर्रास वापर करीत असल्याचे धक्कादायक िचत्र दिसून आले.
अमरावती शहरात २२ तर जिल्ह्यात १२५ पेट्रोलपंप आहेत. पेट्रोल आणि डिझेल हे अतिज्वलनशील असल्याने पंपावर पेट्रोल भरताना कर्मचाऱ्यांनी वाहनधारकांनी आवश्यक ती खबरदारी बाळगणे आवश्यक असते. परंतु, सुरक्षेसंदर्भात नियम युवक, युवतींकडून मोठ्या प्रमाणात धुडकावून लावल्या जातात. काही युवक पेट्रोल भरण्यासाठी रांगेत असूनही त्यांची बाईक सूरूच असते. तर, कुणी फोनवर बोलताना आढळते. कुणी कानाला हेडफोन लावलेले असतात. दिवसभरात सुमारे शंभरेक ग्राहकांना नियमांची आठवण करून द्यावी लागते असे पंपावरील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. पेट्रोल पंपच्या डेंजर झोनमध्ये आलेला फोन उचलणे करणे धोक्याचे ठरू शकते. एका व्यक्तीचे दुर्लक्ष फार मोठी जीवित वित्तहानी होण्यासाठी कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे पेट्रोलपंपांवर नियमांबाबतची हयगय धोकादायक ठरू शकते. त्यासाठी सर्वांनी सतर्क राहून िनयमांचे पालन करणे आवश्यक आहे.
युवकांकडून होते अधिक दुर्लक्ष : पेट्रोलपंपावर युवकांकडून नियमांकडे अधिक दुर्लक्ष होत असल्याचे कर्मचारी सांगतात. कुणी जर मोबाईल हाताळत असेल तर, फोन बंद करा अशा सुचना आम्ही देतो. मात्र "काई नाही होत ना हो' अस म्हणून चालक निघून जातात. बऱ्याचदा चेहऱ्याला रुमाल गुंडाळून युवतीही हेडफोन व्दारे बोलत असतात, असे पंपावरील कर्मचाऱ्यांनी कथन केले.
पंपावरका टाळावा मोबाईलचा वापर? : पेट्रोलभरताना पेट्रोलची वाफ बाहेर पडते. या ज्वलनशील घटकासोबत मोबाईलमधून उर्त्सजित होणाऱ्या लहरींचा कमीत कमी अंतरावर संपर्क आल्यास पेट्रोल पेट घेऊ शकते. ही बाब चालकांसह इतरांनाही धोकादायक ठरू शकते. त्यामुळे मोबाईलवर बोलणे टाळायला हवे.
15 हजार लीटर पेट्रोल 08 हजार लीटर िडझेलची शहरात होते रोज िवक्री

नियमांबाबत दक्षता बाळगावी
पेट्रोलपंपावर डेंजर झोनमध्ये कर्मचारी आणि वाहनचालकांनी नियमांबाबत दक्षता बाळगायला हवी. वाहन चालू असेल तर, गरम इंजिन आग पकडू शकते, शिवाय पेट्रोलची वाफ आणि मोबाईलच्या रेंजचा संपर्क आल्यासही धोका उद्भवू शकतो. अचानक फोन आलाही तरी मशीनपासून दूर जाऊन बोलावे. सौरभजगताप, सचिव, जिल्हा पेट्रोलपंप असोसिएशन, अमरावती.
वाहनचालकांनीकरू नये दुर्लक्ष
पेट्रोलमशीनजवळ फोन उचलणे धोक्याचे आहेत. बहुतेक चालक नियम पाळतातही, काही दुर्लक्षही करतात. एका ग्राहकाला तीस - चाळीस सेकंदच पंपावर थांबावे लागते. त्यामुळे फोन उचलण्याची घाई नको. राजीवबारमाते, व्यवस्थापक.
प्रसंग पहिला
शहरातदुपारी एका पेट्रोल पंपावर महिला वाहनचालकांनी पेट्रोल भरले तेवढ्यात त्यांचा मोबाईल वाजला. कर्मचाऱ्याने त्यांना समज देऊनही पेट्रोल भरून झाल्यावर त्यांनी डेंजर झोनमध्येच फोन रिसीव्ह केला.
प्रसंग दुसरा
एकयुवक पेट्रोल भरण्यासाठी रांगेत लागला. दोन नंबरानंतर त्याचा नंबर येणार तरीही तो हेडफोन लाऊन फोनवर बोलत होता. रांगेतील मागच्या चालकाने त्याला समज दिल्यावर मात्र त्याने फोन बंद केला.